एक्स्प्लोर

Petrol Diesel Prices : कच्चं तेल 80 डॉलरच्या जवळ; देशातील पेट्रोल-डिझेलवरही याचा परिणाम होणार?

Petrol Diesel Price: देशात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता आहे, पण तरीही देशात गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही.

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरांत वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड आता 80 डॉलरच्या आसपास पोहोचलं आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमती वाढल्या आहेत.

ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude Oil) किमतींत आज 0.57 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रति बॅरल 79.10 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. तसेच, WTI क्रूड ऑईल (WTI Crude Oil) प्रति बॅरल 0.82 डॉलर्सच्या वर व्यापार करत आहे आणि ते प्रति बॅरल 73.80 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. या वाढीनंतरही दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चारही महानगरांमध्ये किमती स्थिर आहेत. यामध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही.

कुठे मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल? 

iocl ने जारी केलेल्या दरांनुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे, जिथे किंमत 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे 2022 पासून आतापर्यंत जैसे थे आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार होऊनही दर वाढलेले नाहीत किंवा कमीही झालेले नाहीत. अशातच दर किती दिवस स्थिर राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीचा दिल्ली-मुंबईसह देशातील महानगरांतील तेलाच्या किमतींवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरं पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये
चेन्नई  102.63 रुपये 94.24 रुपये

Petrol Diesel Price Today : राज्यात कोणत्या शहरात किती दर? 

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आणि रुपया आणि डॉलरचा दर यांचाही मोठा वाटा आहे. ओपेक प्लस म्हणजे पेट्रोलियम उत्पादक देशांनी केलेल्या उत्पादनात कपात आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतातील तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम ठेवले आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Navneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हानRajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळRahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानातMVA Meeting for Seating Sharing : मविआच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? जागावाटपाचा तिढा सुटला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Embed widget