एक्स्प्लोर

अमृतसर ट्रेन अपघात, आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू : पंजाब पोलीस

58 जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. पोलिसांकडून आणखी चौकशी केली जात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या अपघाताच्या कारणांचा आता शोध घेतला जात आहे.

अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये भीषण अपघात झालाय. रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असलेल्या लोकांवर ट्रेन चढली, ज्यामध्ये 58 जण मृत्यूमुखी पडले आहेत. पण तब्बल 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पंजाब सरकार आणि केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे. रेल्वे रुळावर उभं राहून लोक रावण दहनाचा कार्यक्रम पाहत होते, अशी माहिती आहे. जालंधरहून अमृतसरला जाणाऱ्या ट्रेनने या लोकांना उडवलं. अमृतसरच्या जोडा फाटकजवळ हा रावण दहनाचा कार्यक्रम साजरा केला जात होता. दरम्यान, एकाचवेळी दोन्ही बाजूंनी आलेल्या ट्रेनने लोकांना उडवलं, असंही बोललं जात आहे. काँग्रेसचे आमदार नवज्योत सिंह सिद्धू यांच्या मतदारसंघातला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सिद्धूंच्या पत्नीही उपस्थित होत्या. कार्यक्रम साजरा केला जात असलेल्या ठिकाणी बाजूलाच रेल्वे रुळ आहे. रेल्वे रुळावर आणि बाजूलाही लोक उभे होते. कार्यक्रम सुरु असतानाच अचानक रेल्वे आली आणि रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवलं. मृतांचा आकडा मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण उत्सवाच्या वेळीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. दरम्यान, या अपघातावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना जखमींच्या मदतीसाठी तत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय सर्व सरकारी यंत्रणाही मदतकार्याला लागली आहे. प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काय? प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनावर प्रंचड संताप व्यक्त केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे कार्यक्रमाची वेळ ही सायंकाळी सहा वाजताची होती. पण कार्यक्रमासाठी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी येणार होत्या. त्या जवळपास साडे सात वाजता आल्या आणि ही ट्रेनची वेळ होती. विशेष म्हणजे ही घटना घडताच सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी घटनास्थळाहून पळ काढला. त्यामुळे लोक नवज्योत सिंह सिद्धू यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. प्रत्यक्षदर्शींचा दुसरा आक्षेप म्हणजे, ट्रेन येण्यापूर्वी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. कार्यक्रमाच्या वेळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी चालू होती, ज्यामुळे ट्रेनचा हॉर्न ऐकायला आला नाही. पण प्रशासनाने पूर्वसूचना देणं गरजेचं होतं, अशं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. अपघातावर कोण काय म्हणालं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं म्हटलं आहे. अधिकाऱ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले असल्याचं मोदींनी म्हटलंय. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या अपघाताच्या चौकशीचं आश्वासन दिलं आहे. ते स्वतः उद्या अमृतसरला जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना मोफत उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना मदतकार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत अमित शाहांनी जखमींनी लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत रेल्वेकडून सर्व प्रकारचं सहाय्य केलं जात असल्याचं सांगितलं आहे. रेल्वेचं स्पष्टीकरण रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड चेअरमन आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी रात्रीच घटनास्थळावर पोहोचणार आहेत. ही घटना रेल्वे फाटकापासून काही अंतरावर घडली, जिथे लोक रेल्वे रुळावर उभे होते, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्मिता वत्स यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची मातीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 03 जुलै 2024: ABP MajhaSensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवरABP Majha Headlines :  11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Kolhapur News : जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Embed widget