(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir: मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत, CRPF ची गाडी घराबाहेर उभी, स्वतःच फोटो केले शेअर
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी (PDP) प्रमुख मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांना पुन्हा एकदा नजरकैदेत (House Arrest) ठेवण्यात आले आहे.
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी (PDP) प्रमुख मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांना पुन्हा एकदा नजरकैदेत (House Arrest) ठेवण्यात आले आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. यासोबतच काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri Pandits) परिस्थितीवरून मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
GOI wants to push the plight of Kashmiri pandits under the rug because its their callous policies that’ve led to unfortunate targeted killings of those who chose not to flee. Projecting us mainstream as their enemy is why Ive been placed under house arrest today. pic.twitter.com/GliRJaJX45
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 21, 2022
...त्यामुळे मला नजरकैदेत ठेवण्यात आले
मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "भारत सरकार काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करू इच्छित आहे, कारण त्यांच्या कठोर धोरणांमुळे या पंडितांच्या दुर्दैवी हत्या झाल्या आहेत. दरम्यान सरकार आम्हाला शत्रू म्हणून पाहत आहे, त्यामुळे मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. असं सांगत मुफ्ती यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
My attempts to visit Suneil Kumar’s family at Chotigam today were scuttled by the administration. The same administration claims that locking us up is for our own security while they themselves visit every nook & corner of the Valley. pic.twitter.com/CloCOgRRVf
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 21, 2022
आणखी एका ट्विटमध्ये मेहबुबा यांनी लिहिले की, “चोटीगाममध्ये आज सुनील कुमारच्या कुटुंबीयांना भेटण्याचा माझा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला. जेव्हा तेच प्रशासन प्रत्येक कानाकोपऱ्यात जात असताना आम्हाला कुलूप लावणे हे चुकीचे असल्याचा दावा करत आहे.
आपच्या नेत्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांना एकत्र करण्यात काँग्रेस अपयशी
यापूर्वी मेहबूब मुफ्ती यांनी काँग्रेसच्या 'आप' विरोधी आंदोलनांवर टीका केली. ते म्हणाले की, केंद्रीय एजन्सींच्या चौकशीला सामोरे जाणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांना एकत्र करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. यावर काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांची गॅंग भ्रष्ट कृत्यांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे. त्यांना न्याय मिळवून द्यायला हवा