एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पॅरासिटेमॉल औषधाच्या दरात 35 टक्क्यांची कपात
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय किंमत प्राधिकरणाने पॅरासिटेमॉल औषधाच्या किंमतींमध्ये 35 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॅरासिटेमॉलच्या गोळ्या याआधीच किंमत नियंत्रण कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. मात्र त्यात आता इंजेक्शनसह इतर औषधांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.
सामान्यपणे चिकन गुणिया आणि डेंग्यूंच्या तापावर पॅरासिटेमॉलचा वापर केला जातो. त्यामुळे अशा रुग्णांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, एनपीपीए अर्थात नॅशनल फार्मसिटीकल प्रायजिंग ऑथेरिटीकडून औषध कंपन्यांना यासंदर्भात आदेश दिले जाणार आहेत. त्यानंतर ही किंमत कपात तत्काळ लागू केली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement