एक्स्प्लोर

सरसंघचालकांना ध्वजारोहणापासून रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याची बदली

केरळमधील पल्लकडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांनी मोहन भागवतांना ध्वजारोहणापासून रोखलं होतं.

तिरुअनंतपूरम (केरळ): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ध्वजारोहणापासून रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. केरळमधील पल्लकडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांनी मोहन भागवतांना ध्वजारोहणापासून रोखलं होतं. राजकीय व्यक्ती शाळेतील ध्वजारोहण करु शकत नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. मात्र 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी स्वत: शाळेनेच मोहन भागवतांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे मोहन भागवतांनी वादानंतरही ध्वजारोहण केलं होतं. दरम्यान, मोहन भागवत यांनी झेंडा फडकल्यानंतर मेरीकुथी यांनी सरकारला अहवाल सादर केला होता. त्या अहवालात मोहन भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यांनी पोलिसांना तसे आदेशही दिले होते. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांची बदली झाल्याने, तर्क-वितर्क लढवणं साहजिकच आहे. मात्र ही बदली नियमित असल्याचा केरळ सरकारचा दावा आहे. केवळ मेरीकुथी यांचीच नव्हे तर अन्य चार जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे. मेरीकुथी यांच्या जागी सुरेश बाबू यांची पल्लकडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक

मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

Embed widget