(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Seema Haider : ATS चौकशीपासून ते वयातील वेगवेगळ्या फेरफारपर्यंतच्या आरोपांवर सीमा हैदर काय म्हणाली? वाचा सविस्तर
Seema Haider ATS Questioning : यूपी एटीएसच्या चौकशी आणि तपासादरम्यान, सीमा हैदरने एबीपी न्यूजला सांगितले की चौकशीदरम्यान तिला कोणते प्रश्न विचारण्यात आले.
Seema Haider ATS Questioning : पाकिस्तानातून प्रेमासाठी भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) सध्या खूप चर्चेत आहे. सीमा PUBG गेम खेळत असताना भारतातील सचिन मीना नावाच्या मुलाच्या प्रेमात इतकी पडली की तिने आपल्या पतीला सोडून चारही मुलांसह आपल्या देशाची सीमा ओलांडली.
सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली. त्यानंतर सचिनबरोबर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहू लागली. स्थानिक पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर यूपी एटीएसच्या टीमला बोलावून अनेक प्रश्न विचारण्यात आले. या संदर्भात एबीपी न्यूजने सीमाशी संवाद साधला आणि काही प्रश्नांबाबत चर्चाही केली.
उत्तर देताना सीमा हैदर म्हणाली, "एटीएसच्या टीमकडून माझी चौकशी करण्यात आली. यावेळी मला प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी विचारण्यात आल्या. मी पाकिस्तानात कशी राहिले? तिथे शिक्षण कसं घेतलं? मी आयुष्यात जे काही केलं त्या बाबतीत सर्व सांगितलं." असं सीमा हैदर म्हणाली. यावेळी तिला पासपोर्ट आणि ओळखपत्रावरील जन्मतारखेच्या फरकाबाबतही प्रश्न विचारण्यात आले."
दोन वेगवेगळ्या वयोगटातील असण्यावर सीमाचे उत्तर
याबाबत प्रश्न विचारला असता सीमा हैदरने सांगितले की, तिचे वय दोन कार्डमध्ये वेगळे लिहिले होते. माझ्या आयडीमध्ये माझ्या वडिलांनी माझे वय 6 वर्ष कमी केले आहे, पण प्रत्येकजण आपलं वय कमी सांगतो. माझ्या पासपोर्टनुसार माझं वय 22 वर्ष आहे पण प्रत्यक्षात माझं वय 27 वर्ष आहे.
भारतातील इतर कोणाशी संपर्क?
सचिनशिवाय भारतातील इतर लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर सीमाने उत्तर दिले की, तिने कोणालाही रिक्वेस्ट पाठवली नाही. तुरुंगात जाण्यापूर्वी सचिन माझा मित्र होता. त्याच्याकडे माझे सर्व आयडी आहेत. माझे सर्व अकाऊंट खाजगी होते. तुरुंगातून बाहेर आल्यावर मी पब्लिक अकाऊंट केले. मी कोणाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही, कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याशी संपर्क साधला नाही." असं सीमा हैदर म्हणाली.
नेपाळमधल्या हॉटेलबाबत चौकशी
सीमाला विचारण्यात आले की, नेपाळमध्ये तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलात, तेथे तुमची नोंद नाही? यावर सीमाने सांगितले की, हॉटेलवाल्यांनी तिला तिचे नाव विचारले नाही कारण सचिन तिच्या आधी तिथे पोहोचला होता. तसेच, सीमा हैदरला आपल्या देशात परत जाण्याची भीती वाटते का? असाही प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर ती म्हणाली, "असे झाले तर माझ्याबरोबर चुकीचे ठरेल कारण पाकिस्तानमध्ये माझे भविष्य नाही. तिथे अभिमानाच्या नावाखाली लोकांना मारले जाते. मी बलुच जमातीची आहे, ते मला सोडणार नाहीत. याआधीही सीमाने अनेकदा सांगितले आहे की ती एकवेळ मरेल पण पाकिस्तानात जाणार नाही."
महत्त्वाच्या बातम्या :
Seema Haider : भारतात पळून आलेली सीमा वारंवार बदलतेय जबाब, सचिनकडूनही दिशाभूल सुरुच