एक्स्प्लोर
भारतीय संरक्षण दलासह, नौदल आणि हवाई दलाचे तब्बल 98 अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात, गोपनिय माहिती लिक होण्याचा धोका
पाकिस्तानी गुप्तहेर महिलेने फेसबुकद्वारे सेजल कपूर नावाचे अकाऊंट बनवून भारतातील विविध सैन्यदलाच्या 98 अधिकाऱ्यांचे कम्प्यूटर हॅक केले आहेत.
नागपूर : पाकिस्तानी गुप्तहेर महिलेने फेसबुकद्वारे सेजल कपूर नावाचे अकाऊंट बनवून भारतातील विविध सैन्यदलाच्या 98 अधिकाऱ्यांचे कम्प्यूटर हॅक केले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारतातील अनेक अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून देशाच्या सुरक्षेसंबंधीची गोपनिय माहिती मिळवली असल्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा इंजिनियर निशांत अग्रवाल याला नागपूरमध्ये अटक झाली होती. निशांतला आयएसआयने हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचे स्पष्ट झाले होते. पाकिस्तानी गुप्तहेर सेजल कपूरने निशांतला हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाच्या सुरक्षेसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती मिळवल्याचे समोर आले होते. आता हे हनी ट्रॅप प्रकरण खूप मोठे असल्याची माहिती समोर आली आहे.
सेजलने केवळ निशांतच नाही तर देशाचे सैन्यदल, वायुसेना, नौदल, पॅरामिलिट्रीसह महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांमधील 98 अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले असल्याचे समोर आले आहे.
सेजल कपूर ही पाकिस्तानी गुप्तहेर भारतातील अधिकाऱ्यांना तिचे अत्यंत आकर्षक फोटो आणि व्हिडियो पाठवून त्यांच्याशी मैत्री करायची. मैत्री झाल्यानंतर ती पुढच्या चॅटसाठी अधिकाऱ्यांना त्यांच्या कम्प्युटरवर व्हिसपर आणि ग्रॅव्हिटी रॅट नावाचे अॅप इन्स्टॉल करायला सांगायची. परंतु हे दोन्ही अॅप मालवेयर होते. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर 'सेजल कपूर' म्हणवून घेणारे आयएसआयचे गुप्तहेर भारतीय अधिकाऱ्यांच्या कंप्युटरमधील संपूर्ण डेटा मिळवत होते.
हे अॅप डाऊनलोड होताच मालवेअर कोडची विचारणा केली जात होती. सेजल कपूर तो कोड समोरच्या अधिकाऱ्याला विचारायची. चॅट करण्यासाठी हा कोड गरजेचा असल्याचे सेजल सांगायची. अधिकारी तो कोड सेजलला द्यायचे. कोड मिळताच अधिकाऱ्यांच्या कम्प्युटरमधील सर्व कागदपत्रे, फाईल्स, फोटो आणि डेटा स्कॅन केला जात होता. इतकेच नव्हे तर त्या अधिकाऱ्यांचे विविध अॅक्सेस आणि पासवर्डही सेजलला मिळत होते.
व्हिडीओ पाहा : पाकिस्तानी मुलींसाठी देशाशी गद्दारी?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement