Seema Haider : पाकिस्तानी सीमा हैदर बनणार बॉलिवूड हिरोईन, सचिनलाही चित्रपटात काम करण्याची ऑफर
Seema Sachin Love Story : पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि सचिनला आता बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर आली आहेत. मेरठमधील एका निर्मात्याने या दोघांना आपल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.
Seema Haider-Sachin Love Story : पाकिस्तानातील सीमा हैदरने (Seema Haider) सचिन मीना (Sachin Meena) नावाच्या भारतीय व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्यानंतर पाकिस्तानी सीमा थेट सीमा पार करून भारतात आली आणि तिने सचिनसोबत लग्न केलं. यानंतर सर्वत्र या दोघांची चर्चा सरु आहे. पाकिस्तानी सीमा हैदरचं भारतात येणं आणि येथे लग्न करून राहणं सर्वच वादाच्या भोवऱ्यात आहे. यातच आता पाकिस्तानी सीमा हैदरला बॉलिवूड हिरोईन होण्यासाठी ऑफर मिळाली आहे. पाकिस्तानी सीमा हैदरला बॉलिवूड निर्माता अमित जानी यांच्याकडून चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. तर सचिन मीनालाही बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर आली आहेत.
पाकिस्तानी सीमा हैदर बनणार बॉलिवूड हिरोईन
पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही, मात्र आता सीमा हैदर खऱ्या आयुष्यात बॉलिवूड हिरोईन बनण्याची शक्यता आहे. सीमा आणि सचिनला आता चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर आली आहे. सीमा आणि सचिनची यांची प्रेम कहाणी बऱ्याच दिवसांपासून व्हायरल झाली आहे. यानंतर एका निर्मात्याने त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली असून त्यांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. दरम्यान, हा चित्रपट त्याच्या प्रेमकथेवर आधारित नसून राजस्थानमधील टेलर कन्हैयाच्या हत्येवर आधारित आहे.
नेपाळमध्ये पहिल्यांदा भेटले सचिन आणि सीमा
उत्तर प्रदेश एटीएसच्या टीमने सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांना एकत्र बसवून अनेक महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे चौकशी केली. यामध्ये त्यांच्या नेपाळमधील भेटीबाबतही प्रश्न विचारण्यात आले होते. पाकिस्तानी सीमा हैदर आणि उत्तर प्रदेशच्या सचिन मीना यांची ओळख ऑनलाईन गेम खेळताना झाली. त्यानंतर ते पहिल्यांदा नेपाळमध्ये एकमेकांना भेटले, असं दोघेही चौकशीत सांगत आहेत.
सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी
पाकिस्तानी सीमा हैदर आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात आली होती. यानंतर सीमाला 4 जुलै रोजी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. पाकिस्ताी सीमा आणि भारतीय सचिन यांची मैत्री पबजी खेळताना झाली. ऑनलाईन गेम खेळताना दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर सीमा सचिनला भेटण्यासाठी सीमा पार करत थेट भारतात पोहोचली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :