Pakistani Drone: अमृतसरमध्ये तस्करीचा प्रयत्न 'बीएसएफ'ने हाणून पाडला, 3.2 किलो हेरॉईन जप्त
ड्रोनने वाहून आणलेला तीन किलो हेरॉईनचा साठा जप्त (Border Security Force seizes over 3 kg heroin) करण्यात आला आहे.
Pakistan Drone Shot Down: पंजाबच्या अमृतसरमध्ये (Amritsar) आंतरराष्ट्रीय सीमेवर अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) गोळीबार करून पाडले आहे. ही घटना घडली. ड्रोनने वाहून आणलेला तीन किलो हेरॉईनचा साठा जप्त (Border Security Force seizes over 3 kg heroin) करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे वारंवार होतोय घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. महिन्याभरात जवनांनी पाच ड्रोन पाडले आहेत.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसर, भारताच्या हवाई हद्दीत आलेले एक ड्रोन पाडण्यात आले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसात बीसएफच्या जवनांनी चार ड्रोन पाडले आहेत.अंदाजे 3.2 किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे.
Border Security Force shoots down Pakistani drone near International Border in Punjab's Amritsar; seizes over 3 kg heroin
— Press Trust of India (@PTI_News) June 5, 2023
बीएसएफचे डीआयजी संजय गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन तीन दिवसांपासून हेरॉइनचे तस्करी करणारे ड्रोन भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नाात होते. या तस्करी करणाऱ्या ड्रोनला पाडण्यात यश मिळाले असून जवळपास 3.2 किलो हेरॉईनचे तीन पाकिट जप्त करण्यात आली आहे. ड्रोनने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. अमृतसर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ड्रोनने अंमली पदार्थाच्या तीन बॅग वाहून आणल्या होत्या.
ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न
अंमली पदार्थांची तस्करी करण्याकरिता पाकिस्तानी ड्रोननी पंजाबमध्ये घुसखोरी करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. महिन्याभरात जवनांनी पाच ड्रोन पाडले आहेत. त्यातील काही ड्रोन बीएसएफने गोळीबार करून पाडली होती. आता पुन्हा ड्रोनद्वारे अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा झालेले प्रयत्न लष्कराने हाणून पाडले आहेत.
ड्रोनच्या घुसखोरीमध्ये वाढ
2021 च्या तुलनेत भारतीय हद्दीत पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीमध्ये वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सुमारे 230 ड्रोन दिसले आहेत, तर 2021 मध्ये ही संख्या 104 होती. त्याच वेळी, 2020 मध्ये हा आकडा 77 होता.
हे ही वाचा :
Naxal Attack: नक्षलवादी पोलिसांविरोधात पुलवामा हल्ल्यासारखा घातक हल्ला करण्याच्या तयारीत? जहाल नक्षलवाद्याचा चौकशीत गौप्यस्फोट