एक्स्प्लोर
Advertisement
टिकली-बांगड्या उतरवल्या, मराठीतही बोलू दिलं नाही
पाकिस्तानने कुलभूषण यांच्या आईला लेकाशी संवाद साधण्यासाठी मातृभाषेत म्हणजेच मराठीत बोलण्यात मज्जाव करण्यात आला. आई आणि पत्नीला कुलभूषण यांच्याशी मातृभाषेत बोलू दिलं नाही.
नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट घालून दिल्याचा टेंबा मिरवणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा उघड पडला आहे.
पाकिस्तानने कुलभूषण यांच्या आईला लेकाशी संवाद साधण्यासाठी मातृभाषेत म्हणजेच मराठीत बोलण्यात मज्जाव करण्यात आला. आई आणि पत्नीला कुलभूषण यांच्याशी मातृभाषेत बोलू दिलं नाही.
इतकंच नाही तर दोघींनाही मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकल्याही काढायला लावल्या होत्या. याशिवाय दोघींना त्यांचे कपडेही बदलण्यास सांगितलं होतं.
कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट, मात्र थेट बोलणं नाहीच!
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली.
पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणास्तव ही बंधनं घातली. मात्र आईला लेकासोबत त्याच्या भाषेत बोलू न देणं ही कुठली सुरक्षितता? असा सवाल भारताने उपस्थित केला आहे.
21 महिन्यानंतर आई-लेकाची भेट हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव 25 डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटले. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव यांना काचेच्या एका बाजूला बसवलं होतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. यांच्या मध्ये असलेल्या काचेच्या भिंतीमधून पाकिस्तानचा अमानवीय चेहरा समोर आला. कुलभूषण यांची आई-पत्नीशी बोलणं झालं पण ते ही फोनच्या माध्यमातून. कान, डोक्यावर जखमांचे निशाण, पाकिस्तानकडून जाधवांचा छळ? भेटीदरम्यान कुलभूषण जाधव निळ्या रंगाच्या कोट परिधान केला होता. पण या भेटीचा फोटो निरखून पाहिल्यास, जाधव यांच्या उजव्या कानावर गडद रंगाचं निशाण दिसत आहे. त्यांच्या डोकं आणि गळ्यावरही काही निशाण आहेत. ज्यावरुन हे जखमांचे निशाण असल्याचा संशय बळावला आहे. जाधवांच्या फाशीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या याचिकेनंतर या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे. स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना कोण आहेत कुलभूषण जाधव? कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतातून त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती. संबंधित बातम्या कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट, मात्र थेट बोलणं नाहीच! कुलभूषण जाधव आई-पत्नीला भेटणार! कुलभूषण यांच्या आई, पत्नी भारतात, सुषमा स्वराज यांच्याशी भेट#WATCH MEA spokesperson Raveesh Kumar on meeting of #KulbhushanJadhav's mother and wife with Jadhav in Islamabad pic.twitter.com/O6HkKoc7WK
— ANI (@ANI) December 26, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement