एक्स्प्लोर

आईवर भारतीय अधिकारी ओरडले, कुलभूषण जाधवांचा कथित व्हिडिओ

आई आणि पत्नीची भेट घालून दिल्याबद्दल कुलभूषण जाधव यांनी पाकचे आभार मानल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी झाल्यानंतर पुन्हा एकदा पाकचा खोटारडेपणा सुरु झाला आहे. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून त्यात भारतीय अधिकारी हे आपल्या आईवर ओरडत होते, असा दावा कुलभूषण करताना दाखवलं आहे. आई आणि पत्नीची भेट घालून दिल्याबद्दल कुलभूषण जाधव यांनी पाकचे आभार मानल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ जारी केला आहे. भारतीय अधिकारी आपल्या आईवर ओरडत असल्यामुळे ती घाबरली आहे, असं मला वाटलं, असं कुलभूषण जाधव व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.

जाधव कुटुंबीयांना अपमानित करणं हे आधीच ठरलं होतं?

माझी तब्येत व्यवस्थित आहे. माझी ठणठणीत प्रकृती पाहून माझ्या आईलाही आनंद झाला, असं ते व्हिडिओत सांगत असल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांनी हेरगिरीची कबुली दिल्याचा कथित व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. मात्र त्यात काटछाट केल्याचं पाहायला मिळत होतं. आताही तसाच प्रकार पाकिस्तानकडून सुरु आहे. हेरगिरीच्या आरोपात कुलभूषण जाधव यांना पाकनं अटक केली असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाहा व्हिडिओ : जाधव कुटुंबीयांचा अपमान पूर्वनियोजित? पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने जाधव कुटुंबीयांचा अपमान करायचं हे आधीच ठरवलं होतं, असा धक्कादायक दावा दहशतवादी हाफिज सईदचा खास सहकारी आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आमीर हमजाने केला आहे. आयएसआयने  जाधव कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान प्रत्येक टप्प्यावर एक कट रचला होता. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचे चप्पला काढणे, कपडे बदलण्याचं कामही पाकिस्तान प्रशासनाने आयएसआयच्या इशाऱ्याने केलं, असा दावा हमजाने केला. सौभाग्यलंकार उतरवले हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव 25 डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटले. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव यांना काचेच्या एका बाजूला बसवलं होतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. यांच्या मध्ये असलेल्या काचेच्या भिंतीमधून पाकिस्तानचा अमानवीय चेहरा समोर आला. कुलभूषण यांची आई-पत्नीशी बोलणं झालं पण ते ही फोनच्या माध्यमातून. पाकिस्तान सरकारनेभेटी दरम्यान, कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढायला लावली होती. तसंच त्यांना आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला होता. संसदेत निषेध पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचे सौभाग्यलंकार उतरवल्याचा निषेध, भारताच्या संसदेत करण्यात आला होता. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निशाणा साधला होता.  पाकिस्तानी मीडियानेही लायकी दाखवली कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी लायकी दाखवून दिली. भेटीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्न विचारले. आपके पतीने हजारो बेगुनाह पाकिस्तानीयों के खून से होली खेली, इसपर आप क्या कहेंगी?  अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं? अशा प्रकारचे प्रश्न पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कुलभूषण यांच्या कुटुंबियांना विचारले. संबंधित बातम्या पाक मीडियाने लायकी दाखवली, कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न ‘पाकिस्तान मुर्दाबाद’... कुलभूषण प्रकरणी शिवसेनेचा संसदेत एल्गार कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला पाककडून विधवेप्रमाणे वागणूक : स्वराज 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget