एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EXCLUSIVE : काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना पाककडून ‘कॅशलेस फंडिंग’
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या तरुणांना पाकिस्तानकडून 'कॅशलेस फंडिंग' होत असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. दगडफेक करणाऱ्यांना पाकिस्तनाकडून पैसे पुरवला जातो, हे सर्वश्रुत आहे. मात्र, कॅशलेस पद्धतीने पैसे दिल्याची माहिती आतापर्यंत समोर आली नव्हती.
एबीपी न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी राजन सिंह यांनी या प्रकरणाची पडताळणी केली. त्यानंतर गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून दगडफेक करणाऱ्यांना वस्तू विनिमय प्रणालीने आर्थिक पुरवठा केला जातो.
वस्तू विनिमय प्रणाली पूर्वीच्या काळी व्यापारासाठी अवलंबली जायची. म्हणजेच एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास, त्याच किंमतीची दुसरी वस्तू समोरच्या व्यक्तीला दिली जायची.
पाककडून दगडफेक करणाऱ्यांना कसा आर्थिक पुरवठा केला जातो?
पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमधून भारतातील श्रीनगरमध्ये अनेक ट्रकची ये-जा सुरु असते. गुप्त सूत्रांच्या माहितीनुसार, या ट्रकमधील सामानातून पाकिस्तान काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्यांना 'कॅशलेस फंडिंग' करतात.
मुजफ्फराबादहून येणाऱ्या एखाद्या ट्रकमध्ये पाच लाखांचं सामान असेल, तर श्रीनगरहून मुजफ्फराबादला परतताना त्यात केवळ 2 लाखांचं सामान असतं. म्हणजेच तीन लाखांचं समान दगडफेक करणाऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं.
भारतीय सुरक्षा यंत्रणांना काही दिवसांपूर्वीच पाकच्या या नापाक प्रकाराची माहिती मिळाली. त्यामुळे आता पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद किंवा श्रीनगरमध्ये पाकिस्तानातून येणाऱ्या वाहनांचा कसून तपास केला जात आहे.
जर काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्यांना पाकिस्तानकडून पुरवला जाणारा पैसा रोखला, तर दगडफेकीची समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही गुप्त सूत्रांचे म्हणणे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement