एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानकडून भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका
नवी दिल्ली : नजरचुकीनं 29 सप्टेबरला पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची आज पाकिस्ताननं सुटका केली. आज वाघा बॉर्डरवर पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांनी चंदू यांना भारतीय लष्कराकडे सुपूर्द केलं.
चंदू मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. ते जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 29 सप्टेबरला चंदू यांनी चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर ते पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागले होते. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं.
चंदू यांच्या सुटकेचं वृत्त समजताच तिकडं बोरविहीर गावात नातेवाईक आणि मित्रांनी जल्लोष केला.
चंदू चव्हाण यांना भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. अखेर पाकिस्तानने चंदू चव्हाण यांची सुटका केली आहे.
“कुठल्याही परिस्थितीत चंदू चव्हाण यांना भारतात परत आणणार”, असा काही दिवसांपूर्वीच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी निर्धार व्यक्त केला होता.
कोण आहेत चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण हे मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले होते. 22 वर्षीय चंदू यांनी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील मिलिट्रीमध्ये आहे. ते सध्या 9 मराठा रेजिमेट कार्यरत आहेत.
https://twitter.com/ANI_news/status/822729565202063361
https://twitter.com/PTI_News/status/822732461452959744
संबंधित बातम्या :
भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली
जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
पाकचा खोटारडेपणा, आता म्हणतात चंदू चव्हाण आमच्याकडे नाहीच!
22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं
पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा
धुळ्याचा जवान पाकच्या ताब्यात, बातमी समजताच आजीचा मृत्यू
होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
चुकून नियंत्रण रेषा ओलांडलेला भारतीय जवान पाकच्या ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement