VIDEO Kashmir Handloom Industry : दहशतवादी हल्ला अन् काश्मीरच्या हँडलूम उद्योगाला पुन्हा ग्रहण, एक ते दीड हजार कोटींचा व्यवसाय अंधारात
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यामुळे हँडलून व्यवसायातील दोन ते अडीच लाखांच्या हातचा रोजगार गेल्याचं चित्र आहे. पर्यटकांनीच पाठ फिरवली तर शाली, गालिचे घेणार कोण?

श्रीनगर : काश्मिरी हस्तकला (Kashmiri Handloom Industry) त्यांच्या कलात्मक कामासाठी आणि भव्यतेसाठी जगभर ओळखल्या जातात. मात्र पहलगामच्या हल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) काश्मीरच्या या पारंपरिक व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. काश्मिरी शाली (Kashmiri Shawl) आणि गालिचे (Kashmiri Handmade Carpets) व्यावसायिकांचं मोठं नुकसान होतं आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानं काश्मीरच्या हँडलूम उद्योगावर शोककळा पसरल्याचं चित्र आहे. काश्मिरी शाली, गालिचे, महिलांचे कपडे बनवणे हे उद्योग ठप्प झाल्याचं दिसंतय. तब्बल एक ते दीड हजार कोटीची उलाढाल असलेल्या हस्तकला उद्योगाचे भविष्य अंधारात गेलं आहे.
या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन-अडीच लाख लोकांच्या हातचा रोजगार गेला. पर्यटकांनीच पाठ फिरवली तर शाली, गालिचे घेणार कोण?
काश्मिरी गालीचा आणि शालींना मोठी मागणी
काश्मिरमध्ये फिरण्यासाठी जाणारे पर्यटक तिथल्या शाली आणि गालिचांकडं आपोआप आकर्षित होतात. शाली आणि गालिचे बनवण्यासाठी मोठी मेहनत आणि एकाग्रता लागते. या दोन सूत्रांवर हा व्यवसाय आजही तग धरून आहे. डिझाइनच्या शाली आणि महिलांच्या ड्रेसवर बनवले जाणारे नक्षीकाम हे हातानं केलं जातं.
शाली आणि महिलांच्या कपड्यावरील नक्षीकामानंतर इथले गालिचे बनतात. त्यासाठीसुद्धा एकाग्रता आणि संयम लागतोच. अचूक आणि सावधगिरीनं हे गालिचे बनवतात. त्यासाठी अनुभवही खूप महत्त्वाचा मानला जातो. एक गालिचा बनवायला किमान सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणूनच काश्मीरच्या या गालिचांची किंमतसुद्धा डोळे विस्फारणारी असते. त्यावरील करण्यात येणाऱ्या आकर्षक नक्षीकामामुळे या गालिचांना देशातच नव्हे तर जगभरात मोठी मागणी आहे.
काश्मिरी हस्तकला उद्योग अर्ध्यावर आला
21 व्या शतकात नवी पिढी या व्यवसायाकडं फारशी आकर्षित नसल्यानं हा व्यवसायही निम्म्यावर आला आहे. एकेकाळी तीन ते पाच लाख लोक या हँडलूमच्या व्यवसायात होते. पण आता निम्मेसुद्धा उरले नाहीत. पण गेल्या चार-पाच वर्षांपासून पर्यटकांचा ओघ वाढल्यानं या व्यवसायाला बरकत आल्यासारखं वाटत होतं. अशातच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हँडलूम उद्योगावरही शोककळा आली. किमान एक ते दीड हजार कोटींचा हा उद्योग भविष्य हरवून बसला आहे.
ही बातमी वाचा:























