Pahalgam Terror Attack: स्टुडंट व्हिसावर पाकिस्तान गाठलं, जिहादी ट्रेनिंग घेऊन पहलगामध्ये आला अन् 26 निष्पापांचा बळी घेतला; काश्मिरी दहशतवादी आदिल अहमद ठोकर कोण?
Pahalgam Terror Attack: सहा वर्षांनी परतला तो 3-4 दहशतवाद्यांकडूनच. त्याने पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबाकडून प्रशिक्षण घेतले आणि नियंत्रण रेषा ओलांडून भारतात प्रवेश केला.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकूण 26 भारतीयांचा मृत्यू झालाय. यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असणाऱ्या 14 दहशतवाद्यांपैकी एक असणाऱ्या आदिल अहमद ठोकर (Adil Ahmed Thokar) याच्याविषयी महत्त्वाचा खुलासा झालाय. (Jammu Kashmir) पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आदिल अहमद ठोकर 2018 मध्ये पाकिस्तानला गेला होता. सहा वर्षांनी परतला तो 3-4 दहशतवाद्यांसोबत.
त्याने पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबाकडून प्रशिक्षण घेतले आणि नियंत्रण रेषा ओलांडून भारतात प्रवेश केला. आदिल आणि त्याच्या साथीदारांनी पर्यटकांवर मंगळवारी (22 एप्रिल) हल्ला केला. यात 26 भारतीय नागरिक ठार झाले. आदिल हा जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बीजबेहरा येथील गुरे गावचा रहिवासी आहे .आदिल अहमद ठोकरला पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही मानले जात आहे .आदिल आणि त्याच्या साथीदारांचा सध्या सुरक्षा दलाकडून तपास सुरू आहे .
सहा वर्षे राहिला पाकिस्तानात
मिळालेल्या माहितीनुसार आदिल अहमद हा अनंतनाग जिल्ह्यातील गुरे गावचा रहिवासी आहे. तो 2018 मध्ये शिक्षणासाठी स्टुडन्ट व्हिसा घेऊन पाकिस्तानला गेला होता . गुप्तचर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानला जाण्यापूर्वीच तो कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होता .भारत सोडण्यापूर्वीही सीमेपलीकडे बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांची त्याचा संबंध होता .शिक्षणासाठी पाकिस्तानात पोहोचल्यानंतर आदिल अचानक गायब झाला .त्याने कुटुंबाशी बोलणंही बंद केले होते .सुमारे आठ महिने त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती .गुप्तचर संस्थांनी त्याच्या डिजिटल क्रियाकल्पांवर लक्ष ठेवले पण त्याचाही उपयोग झाला नाही .आदिलच्या घरावरही नजर ठेवण्यात आली परंतु एजन्सीजला कोणतीही माहिती मिळाली नव्हती .
पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण ?
गुप्तचर सूत्रानुसार आदिल पाकिस्तान मध्ये कट्टरपंथी विचारसरणी आणि लष्कर प्रशिक्षण घेत होता अशी माहिती आहे .पाकिस्तान मधील लष्करे तय्यबा एलईडी या दहशतवादी संघटनेच्या सूत्रधारांच्या प्रभावाखाली तो आला .2024 अखेरीस आदिल अहमद ठोकर पुन्हा गुप्तचर यंत्रणेत समोर आला मात्र त्यावेळी तो भारतात होता .आदींनी ऑक्टोबर 2024 मध्ये पुंचराजवरी सेक्टरच्या कठीण मार्गावरून नियंत्रण रेषा ओलांडली .या भागात गस्त घालणे हे खूप कठीण जाते . उंच पर्वत घनदाट जंगलांचा हा परिसर बेकायदेशीर घुसखोरीसाठी ओळखला जातो.
आदिल सोबत तीन-चार जणांचा एक छोटासा गट होता त्यापैकी एक पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा होता ज्याला सुलेमान असेही म्हटले जाते .पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आणखी एक प्रमुख आरोपी म्हणजे सुलेमान .मुसाला भारतीय हद्दीत आणण्यात आदिलची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे .जम्मू आणि काश्मीर मध्ये प्रवेश केल्यानंतर आदिलने कोणालाही कळू दिले नाही .तो काही काळ किस्तवाडमध्ये दिसला होता मग तो अनंत नागला गेला .त्याने त्रास टेकड्यांमधून अतिरेक्यांनी वापरलेल्या अंतर्गत मार्गांचा वापर केला असावा असेही सांगितले जात आहे .
अनंतनागमध्ये लपला,दहशतवादी गटांना पुन्हा सक्रिय केले
आदिल अहमद ठोकर याने अनंतनागमध्ये पळ काढला . अनेक दिवस तो अनंत नाग मध्येच लपून बसल्याचं सांगितलं जातं .अनेक आठवडे गुप्तपणे निष्क्रिय दहशतवादी गटांना त्यांना पुन्हा सक्रिय केलं .एखादा मोठा हल्ला करण्यासाठी योग्य जागा आणि संधीचे तो वाट बघत होता असे सांगितले जात आहे .22 एप्रिल ला त्याला ती संधी मिळाली .पहलगामच्या बैसऱ्यांच्या सभोवतालच्या घनदाट जंगलातून पर्यटक जमलेल्या ठिकाणी हातात रायफल्स घेऊन दहशतवाद्यांसह तो गेला . हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी धर्माबद्दल विचारणा करत पर्यटकांना गोळ्या घातल्या .
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यातील तीन प्रमुख संशयीतांपैकी आदींचे औपचारिक नाव जाहीर केले आहे .इतर दोघांची ओळख पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तलहाभाई अशी झाली आहे .तिघांचेही रेखाचित्र प्रसिद्ध झाले आहेत .त्यांच्या अटकेसाठी विश्वसनीय माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे .अनंतनाग पहलगाम आणि आसपासच्या भागात सुरक्षा दलांचा शोध सुरू आहे .
हेही वाचा:






















