एक्स्प्लोर

विमान कंपन्यांनी तिकीटदर वाढवले, श्रीनगरहून येण्यासाठी तिप्पट भाडेवाढ; नेटीझन्सचा संताप, सरकारने घेतली दखल

डीजीसीएने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. पहलगाम येथील दुर्घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटकांकडून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Terrorist attack) काश्मीर खोऱ्यातून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून विमान तिकीट आणि रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, देशावरील दहशवादी हल्ल्याच्या संकटात काही विमान कंपन्यांनी स्वत:ची संधी शोधत विमान तिकीटाचे दर तीन पटीने वाढवले आहेत. सोशल मीडियावर काही युजर्संकडून सध्याच्या विमान (Ariline) तिकीटाचे दर शेअर करण्यात आले आहेत. श्रीनगरहून मुंबई आणि दुसरीकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटदर वाढविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर, नागरी उड्डाण विभागाने देशभरातील एअरलाईन्सला निर्देश दिले आहेत. विमानकंपन्यांनी तिकीट रद्दचे चार्ज आणि rescheduling चार्ज न लावण्याचे आदेश DGCA ने  दिले आहेत. तसेच, विमान कंपन्यांनी तिकीट दर न वाढविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

डीजीसीएने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. पहलगाम येथील दुर्घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटकांकडून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे, श्रीनगरहून देशभरात विमानांचे उड्डाण वाढविण्या यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, हजारो पर्यटक आणि भाविक अमरनाथ यात्रेसाठी काश्मिरला आले आहेत. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर ते आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे, स्वस्त तिकीट दर आणि विमानांची संख्या वाढविण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत. 

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरहून मुंबई जाण्यासाठी असणाऱ्या तिकीटांचे दर वाढविण्यात आल्याचे काही युजर्संने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यानुसार, तब्बल तीन पट जास्त दराने हा प्रवास करावा लागत असून श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट 56 हजार रुपयांपर्यत वाढवल्याचे एका ट्विटर युजर्संने स्क्रीन शॉट शेअर करुन म्हटले. त्यामुळे, नेटीझन्सने विमानकंपन्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला असून संकटात संधी शोधण्याचं काम दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचेही नेटीझन्सने म्हटले आहे. 

श्रीनगरहून अतिरिक्त 4 विमानांचे उड्डाण 

दरम्यान, सरकारच्या आदेशानंतर एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीने श्रीनगरहून उड्डाण करणाऱ्या 4 विमानांची संख्या वाढवली आहे. त्यातील दोन विमाने ही दिल्लीसाठी असून 2 मुंबईसाठी वाढविण्यात आली आहेत. आपली सुट्टी मध्येच सोडून जे घरी परतू इच्छित आहेत, त्यांसाठी ही अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्यात आलीय. 

हेही वाचा

आदिलभाईंनी घरी नेऊन जेवू घातलं, सुखरुप पोहोचवलं; काश्मीरमधीलं माणुसकीचं उदाहरण, रुपाली ठोंबरेंच्या डोळ्यात पाणी

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget