पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, म्हणाले, हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असेल तर..
JD Vance On Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे .

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. दरम्यान दोन्ही देशांशी आम्ही संपर्कात असून संपूर्ण जगाचा या दोन्ही देशांवर लक्ष असल्याची सूचक प्रतिक्रिया अमेरिकेने दिल्यानंतर आता अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हांस यांनी पाकिस्तानने त्यांच्या देशात असलेल्या दहशतवादाला ठेचण्यासाठी भारताला मदत करावी असं वक्तव्य त्यांनी केलंय. अमेरिकेकडून पहिल्यांदाच या हल्ल्यासाठी पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. 1 मे रोजी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "या दहशतवादी हल्ल्याला भारत अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही, अशी आम्हाला आशा आहे " असे ते म्हणाले . (Pahalgam Terror Attack)
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांचा जीव गेला . त्यानंतर संपूर्ण जगात या दहशतवादी हल्ल्याची मोठी चर्चा आहे .भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती आहे . पाकिस्तान विरुद्ध भारताने मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे .भारताकडून होणाऱ्या आर्थिक कोंडीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे . दरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून आलेल्या वक्तव्यानंतर आता अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी भारत पाकिस्तानच्या संघर्षावर प्रतिक्रिया दिलीय . (Pakistan)
काय म्हणाले अमेरिकेचे उपराष्ट्रपती ?
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हांस म्हणाले, ' जर पाकिस्तान या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असेल तर त्यांनी त्यांच्या हद्दीत कार्यरत असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी भारताला सहकार्य करावे .पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला .या हल्ल्यावर व्हांस यांनी पहिली प्रतिक्रिया केली .2019 मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात घातक हल्ला आहे .त्यावेळी व्हांस आणि त्यांचे कुटुंब चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते .
अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचे हे वक्तव्य महत्त्वाचे का?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे .गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या व्हांस यांनी instagram वरील एका पोस्टमध्ये या हल्ल्याचा निषेधही केला होता .तसेच हल्ल्यामध्ये पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत असल्याचंही ते म्हणाले होते .
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची एस जयशंकर यांच्याशी चर्चा
पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटक आणि परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला .अलीकडच्या काळातील काश्मीर खोऱ्यातील नागरिकांवर झालेल्या सर्वात घातक हल्ल्यांपैकी हा हल्ला होता .या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध बिघडत असताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबीओ यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली .त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली .रुबीओ यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य करण्यास व त्यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी काम करण्यास सांगितले होते .
हेही वाचा:
























