एक्स्प्लोर

Pahalgam Attack: कोकरनागच्या जंगलात भारतीय सैन्याला दहशतवादी दिसले पण, गोळ्याही झाडल्या, पण...

Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन या सगळ्यांना ठार मारले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव.

India Vs Pak Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. लष्कराने आणि इतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई वेगाने सुरू केली. पहलगामलगतच्या कोकरनाग जंगलाला (Kokernag Forest) वेढा देण्यात आलाय. या जंगलात दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. जमिनीवरील शोध मोहिमेसह ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संपूर्ण जंगलाचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान या जंगलात चार दहशतवाद्यांची (Terrorists) एक टोळी अनेकदा दिसल्याची माहिती समोर आली आहे. भारतीयसुरक्षा दलांसह (Indian Army) त्यांची चकमकही झालीय. मात्र, पहलगाममध्ये हल्ला (Pahalgam Attack) करणारे हे तेच दहशतवादी आहेत का, याचा शोध अद्याप लागलेला नाही. भारतीय सैन्याकडून ड्रोनद्वारे कोकरनाग जंगल परिसरात टेहळणी केली जात असून या दहशतवादी टोळीचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सध्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा कसून तपास सुरु आहे. दहशतवादी कुठून आले होते, याची माहिती गोळा केली जात आहे. दहशतवादी पहलगामपर्यंत कोणत्या मार्गाने आले, हल्ल्यानंतर कुठे गेले याचा सध्या कसून तपास सुरू आहे. त्यासाठी बैसरन व्हॅलीत सापडलेली काडतुसांच्या पुंगळ्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरु आहे. श्रीनगर परिसरात  प्रत्येक चौकीवर सुरक्षा दलांकडून नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. कोण कशासाठी आले आहे, ही माहिती विचारली जात आहे. या भागातील हॉटेल्समध्येही सुरक्षा दल आणि पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. 

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानी सैन्याने सोमवारी रात्री नियंत्रण रेषेलगत अंदाधुंद गोळीबार केला. कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याकडूनही जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले.

भारतीय लष्कर कोणतीही कारवाई करण्यासाठी सज्ज: राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. सुमारे 40 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. कोणतीही कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्याचे समजते.

आणखी वाचा

पाकिस्तानच्या मदतीला पहिला देश मैदानात, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

Embed widget