Operation Sindoor : पहलगामवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचा पुरावा काय? NIA ने आतापर्यंत काय तपास केला? पी चिदंबरम यांचा सवाल
P Chidambaram on Pahalgam Terrorist Attack : एनआयएने आतापर्यंत या प्रकरणात काय तपास केला याची माहिती ते देत नाहीत. त्यांच्याकडे या हल्ल्याची स्पष्ट माहिती आहे का? असा प्रश्न पी चिदंबरम यांनी केला.

नवी दिल्ली : पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानातून आले होते, याचे काय पुरावे आहेत? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पहलगाम हल्ल्यासंबंधी केलेल्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या हल्ल्यात देशांतर्गत दहशतवादीही सहभागी असू शकतात, एनआयएने आतापर्यंत काय केलंय? असा प्रश्नही चिदंबरम यांनी विचारला. संसदेत होणाऱ्या चर्चेच्या काही तास आधी हे वक्तव्य केल्यानं यावरुन मोठा वाद निर्माण झाला.
संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा सुरु होण्याआधीच काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या एका वक्तव्याने राजकीय वादळ निर्माण झालं. पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचा पुरावा काय असा प्रश्न पी. चिदंबरम यांनी शनिवारी एका मुलाखतीवेळी केला. या हल्ल्यात देशांतर्गत दहशतवादी देखील सहभागी असू शकतात, असा संशयही त्यांनी बोलून दाखवला.
पी चिदंबरम यांचे प्रश्न काय?
एनआयएने या आठवड्यात काय काम केले, हे सांगायला ते तयार नाहीत. एनआयएने दहशतवाद्यांची माहिती मिळवली आहे का? ते कुठून आले होते याची त्यांना माहिती मिळाली आहे का? की ते देशातीलच दहशतवादी होते? ते पाकिस्तानातून आले होते हे तुम्ही का मान्य करत आहे, तुमच्याकडे तसे काही पुरावे आहेत का?
भाजपची चिदंबरम यांच्यावर टीका
पी. चिदंबरम यांनी उपस्थित केलेल्या याच संशयावरुन भाजप आक्रमक झाली. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल अशा वक्तव्यामुळे आपल्या सैन्याच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो अशी भाषा विरोधकांनी आणि काँग्रेसनं वापरु नये अशा शब्दात केंद्रीय मंत्री किरेन रिजीजूंनी ठणकावलं.
दरम्यान, आपल्याला कोणत्याही पुराव्यांची गरज नाही. पहलगाम हल्ला पाकिस्ताननेच केला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली.
पहलगाम हल्लानंतर सरकारनं ऑपरेशन सिंदूर राबवलं, ते तडकाफडकी बंद केलं. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी वारंवार मध्यस्थी केल्याच्या वल्गना, यामुळे याबाबत आधीच विरोधकांना यावरुन अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. संसदेतही यावरुनही गदारोळ पाहायला मिळतो आहे, या सगळ्यावर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी निवदेन देऊन विरोधकांचं समाधान करुन, त्यांना शांत करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
ही बातमी वाचा:























