ऑक्सफोर्डच्या 'कोविशिल्ड' लसीचे 5 कोटी डोस तयार, तज्ज्ञ समितीकडून मंजुरी
कोविड -19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी तीन कंपन्यांकडून परवानगी मागितली आहे.मात्र, ऑक्सफोर्ड ही पहिली लस आहे, ज्यास तज्ञ समितीने मान्यता दिली आहे.
ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीला CDSCO पॅनेलने शुक्रवारी मान्यता दिल्यानंतर अंतिम निर्णयासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला याची शिफारस केली गेली आहे. आपत्कालीन वापरासाठी ब्रिटन आणि अर्जेंटिनाने या लसीला यापूर्वीच मान्यता दिली आहे. अशा परिस्थितीत ऑक्सफोर्डची कोविड -19 लस मंजूर करणारा भारत तिसरा देश असेल. ही भारतातील पहिली लस आहे, जी तज्ञ समितीच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णयासाठी डीसीजीआयकडे पाठविली गेली आहे.
लस निर्मिती कशी झाली?
ऑक्सफोर्डची लस भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने 'कोविशिल्ड' या नावाने अॅस्ट्रजेनिकाच्या सहकार्याने विकसित केली आहे. तर दुसरीकडे भारत बायोटेक आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने 'कोवॅक्सिन' तयार करत आहे. तर त्याच वेळी अमेरिकन औषधनिर्माण संस्था फायझरने बायोएनटेकच्या सहकार्याने फायझर लस तयार केली आहे.
ऑक्सफोर्ड लस प्रथम मंजूर
कोविड -19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी तीन कंपन्यांकडून परवानगी मागितली गेली आहे. भारत बायोटेकच्या “कोवॅक्सिन” संदर्भात तज्ज्ञ समितीने अजून डेटा मागितला आहे. तर फायझरने सादरीकरणासाठी डेटा सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे. अशा परिस्थितीत ऑक्सफोर्ड ही पहिली लस आहे, ज्यास तज्ञ समितीने मान्यता दिली आहे.
प्रथम लस कोणाला दिली जाईल सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की कोरोना लस फ्रंट लाइन कोरोना योद्धा म्हणजेच आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जणार आहे. यासह, लसीकरणात वृद्ध लोक आणि पोलिसांना प्राधान्य दिले जाईल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफोर्ड अॅस्ट्रॅजेनेका कोविड -19 लसचे सुमारे पाच कोटी डोस तयार केले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे म्हणणे आहे की 2021 च्या मार्चपर्यंत 100 दशलक्ष डोस तयार करण्याचे लक्ष्य आहे.
देशवासीय बर्याच काळापासून कोरोना लसीची वाट पाहत होते. कोरोनामुळे अमेरिकेनंतर भारत हा जगातील सर्वाधिक प्रभावित देश आहे. अशा परिस्थितीत, लस मंजूर झाल्यामुळे लोकांना नवीन आशा मिळाली आहे जेणेकरुन त्यांना या साथीचा सामना करता येईल.
संबंधीत बातमी : Corona Vaccine | सीरमच्या 'कोविशील्ड' लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी
Dr Harsh Vardhan: पहिल्या टप्प्यातील लसीकरणाच्या ड्राय रनसाठी पूर्णपणे तयार : डॉ. हर्षवर्धन