एक्स्प्लोर

राजधानी दिल्लीत उद्या शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची सर्वात मोठी बैठक, 15 पक्षांचे नेते एकत्र येणार 

उद्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)चे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत. आज त्यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. उद्या शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंत्री नवाब मलिकांनी दिली आहे. या बैठकीला 15 ते 20 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी  दिल्लीत होणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. 

दरम्यान या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक म्हणाले की, आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार हे करणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. 

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवार यांची भेट घेतली होती आणि आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

उद्या सकाळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आणि संध्याकाळी चार वाजता विरोधी पक्षनेते पवारांच्या घरी एकत्र येतील.  2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत..पण पश्चिम बंगाल मध्ये ममतांनी ज्या पद्धतीने भाजपला टक्कर दिली त्यानंतर भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेस वगळता इतरांनी एकत्र येण्याची गरज आहे का याबाबत या हालचाली सुरू आहेत.. उद्याच्या बैठकीसाठी काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी उपस्थित असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही.

यांची असणार उपस्थिती 

शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील महत्वाच्या नेत्यांसह माजी निवडणूक आयुक्त, विचारवंत देखील असणार आहेत.

1) यशवंत सिंन्हा
2) पवन वर्मा
3) संजय सिंग
4) डी.राजा
5) फारुख अब्दुला
6) जस्टीस ए. पी.शाह
7) जावेद अख्तर
8) के सी तुलसी
9) करन थापर
10) आशुतोष
11)माजीद मेमन
12) वंदना चव्हाण
13) एस वाय कुरेशी (Former CEC)
14) के सी सिंग
15) संजय झा
16) सुधींद्र कुलकर्णी
17) अरुण कुमार, Economist
18) कोलिन गोंन्सालविस
19) घनश्याम तिवारी
20) प्रीतिश नंदी
 
पवार प्रशांत किशोर यांच्यात कुठली खलबतं शिजतायत?
2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार आणि प्रशांत किशोर अवघ्या दहा दिवसांच्या आत दोघे दुसऱ्यांदा भेटले. 11 जूनला मुंबईत आणि आज दिल्लीत. पाठोपाठ उद्या राष्ट्रीय राजकारणातले 15 विरोधी पक्ष नेते पवारांच्या घरी एकवटत आहेत.. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बॅनरखाली हे सगळे विरोधी पक्ष एक येत आहेत.

मार्च महिन्यात संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर पवार तीन महिन्यांच्या कालावधीनंतर दिल्लीत आले.. मधल्या काळात त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे सार्वजनिक जीवनातले कार्यक्रम मंदावले होते.. पण आज दिल्लीत आल्यानंतर ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.. एकीकडे काँग्रेसला अजून पूर्णवेळ अध्यक्ष नाही... सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसल्याने यूपीएच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त होतात... त्यात पवारांची ही खेळी काँग्रेसला वगळून देशात तिसरी आघाडी निर्माण करणार का हे पाहावे लागेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Century : किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule Dance Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचं लग्न, सुप्रिया सुळेंचा तुफान डान्स
Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन
Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Century : किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
मला आज इथं मत मागताना आनंद होतोय; गुवाहटीफेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात असं का म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिकेच्या मतदानादिवशी कामगारांना सुट्टी न दिल्यास कारवाई; काय सांगतो लोकप्रतिनिधित्व कायदा?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
नगरपालिका निवडणुकीत भाजप 175 जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल, भाजपचा अंतर्गत सर्व्हे काय सांगतो, कोण मोठा भाऊ?
Mumbai News : प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
प्रभादेवीत शाखेसमोरील शेड उभारणीवरुन राडा, समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद, हेल्मेटनं मारामारीचा व्हिडिओ समोर
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
पुण्यातील पंचतारांकीत हॉटेल उडवून देण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, कॉल करणाऱ्याला अटक
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
Embed widget