India Pakistan War Live Updates: जैश-ए- मोहम्मदचा डाव उधळला, 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

Operation Sindoor LIVE Updates: पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं थेट इस्लामाबादवर हवाई हल्ला केल्याची माहिती आहे.

Advertisement

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 May 2025 06:42 AM
India Pakistan War LIVE: भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, आकाशानंतर समुद्रातूनही पाकिस्तानचं कंबरडं मोडलं

India Pakistan War: भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीत. आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले. 14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं. भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं.

पार्श्वभूमी

Operation Sindoor LIVE Updates : भारतानं (India Pakistan Tensions) ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरु केल्यानंतर पाकिस्ताननं (Pakistan) भारताच्या 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याच प्रयत्न केला होता. भारतानं तो प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आज रात्री पाकिस्ताननं जम्मू काश्मीर, पंजाब (Punjab), राजस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तो भारतानं नाकाम केला आहे.  भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं (S-400 Air Defense System) पाकिस्तानचं ड्रोन (Pakistan Drone), मिसाईल आणि लढाऊ विमानं (Fighter Jets) पाडली आहेत. भारतानं इस्लामाबाद (Islamabad), कराची, लाहोरमध्ये (Lahore) प्रतिहल्ले केले आहेत.  


पाकिस्तानने राजस्थानवर केलेल्या ड्रोन हल्ला उधळला असून राजस्थानच्या गंगा नगरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानकडून केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळल्याची माहिती मिळत आहे. 


जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भल्या सकाळी जम्मूकडे रवाना झालेत. रात्री पाकिस्तानकडून झालेल्या अयशस्वी ड्रोन हल्ल्याचा आढावा घेण्यासाठी जात असल्याचं ट्विट अब्दुल्लांनी केलं. जम्मू आणि इतर भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता.


भारताच्या तिन्ही दलांकडून पाकिस्तानची कोंडी, एलओसीवर भारतीय लष्कराचा गोळीबार, पाकिस्तांनी शहरांवर एअर स्ट्राईक तर कराची बंदरात आयएनएस विक्रांतकडूनही धमाका करण्यात आला आहे. 

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.