Operation Sindoor: भारतीय लष्करानं पाकिस्तानचं फायटर जेट JF-17 पाडलं; चीनकडून 'गिफ्ट' मिळालेलं पाकचं लढाऊ विमान चक्काचूर
Operation Sindoor: पाकिस्तानचं जेएफ 17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती. चीनकडून पाकिस्तानने घेतलेलं जेएफ १७ लढाऊ विमान पाडल्याची माहिती. काश्मीरच्या पंपोर भागात पाकिस्तानचं जेएफ 17 पाडलं.

Operation Sindoor: भारतीय लष्करानं (Indian Army) पाकिस्तानातील (Pakistan) तब्बल 9 दहशतवादी तळांवर (Terrorist Base) हल्ला करुन, पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापतींना चोख प्रत्युत्तर तर दिलं, पण त्यासोबतच पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांनाही न्याय दिला आहे. अशातच भारताच्या एअर स्ट्राईकनंतरही (India Air Strike 9 Terror Bases In Pakistan) पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपल्या कुरापती करण्याचा प्रयत्न केलेला. पण, भारतीय सैन्यानं इथेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत माघारी धाडलंय.
भारतानं पाकिस्तानचं जेएफ 17 लढाऊ विमान (Fighter Jet JF 17) पाडल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलानं पाडलेलं पाकिस्तानी लढाऊ विमान हे पाकिस्तानी (चीनी जेएफ-17) लढाऊ विमान आहे. लष्करानं काश्मीरच्या पंपोर भागात पाकिस्तानचं जेएफ 17 पाडलं.
पाकिस्ताननं चीनकडून घेतलेलं जेएफ 17 विमान काश्मीरच्या पंपोर भागात पाडलं गेल्याची माहिती मिळत आहे. चिनी जेएफ-17 थंडर हे चीन आणि पाकिस्ताननं संयुक्तपणे विकसित केलेलं एक हलकं, सिंगल-इंजिन मल्टी-रोल फायटर जेट आहे. याच्या पहिल्या प्रोटोटाईपनं 2003 मध्ये उड्डाण घेतलेलं. हे पाकिस्तानी एअर फोर्सचं मुख्य लढाऊ विमान असल्याची माहिती मिळत आहे.
JF-17 लढाऊ विमानाची वैशिष्ट्य काय?
भारतीय लष्करानं पाकिस्तानचं जे लढाऊ विमान पाडलं, ते चीनकडून घेतलेलं जेएफ 17 आहे. JF-17 ची लांबी सुमारे 14.9 मीटर, विंगस्पॅन 9.45 मीटर आणि उंची सुमारे 4.77 मीटर आहे. याचं जास्तीत जास्त टेकऑफ वजन 12,474 किलोपर्यंत आहे. हे लढाऊ विमान रशियन Klimov RD-93 किंवा चिनी Guizhou WS-13 टर्बोफॅन इंजिनद्वारे चालवलं जातं. ज्यामुळे ते जास्तीत जास्त Mach 1.6 (सुमारे 1,910 किमी/तास) वेग मिळवू शकतं.
हे विमान 7 हार्डपॉइंट्सवर 1,500 किलोग्रामपर्यंत हत्यारांची नेआण करू शकतं, ज्यामध्ये एअर-टू-एयर मिसाइल्स, एयर-टू-ग्राऊंड बॉम्ब आणि अँटी-शिप मिसाइल्सचा समावेश आहे. याच्या हत्यारांमध्ये चीनी PL-5, PL-12, PL-15 मिसाइल्स आणि GPS गायडेड बॉम्बचा समावेश आहे. ज्यामुळे ते हवेत आणि जमिनीवरील दोन्ही ठिकाणांच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
JF-17 मध्ये आधुनिक एव्हियोनिक्स, कंप्युटराइज्ड फ्लाइट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले, डेटा लिंक्स आणि इलेक्ट्रॉनिक वारफेयर सिस्टम आहे, ज्यामुळे ते मध्यम ते कमी उंचीवर उच्च गतिशीलता आणि सुधारित लढाऊ क्षमता देतं. त्याची रेंज सुमारे 2 हजार किलोमीटर आहे, ज्यामुळे हे लढाऊ विमान लांब पल्ल्याच्या लढाईसाठी योग्य असल्याचं बोललं जातं.
पाहा व्हिडीओ : India Attack On Pakistan | भारतानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून केली दहशतवादी तळांवर कारवाई
महत्त्वाच्या इतर बातम्या :

















