एक्स्प्लोर

Donald Trump : हो मी ऐकलंय, हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

Operation Sindoor  नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आहेत.

वॉशिंग्टन : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारताच्या सैन्य दलांकडून पाकिस्तान आणि पाकव्यप्त काश्मीरमधील 9  दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करण्यात आले आहेत. ही कारवाई मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे स्ट्राइक करण्यात आले.  

भारतानं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारताचे एअरस्ट्राईक इट इज शेम अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा, असा आग्रह त्यांनी केला आहे.  

ऑपरेशन सिंदूर बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले.  हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, असं ट्रम्प म्हणाले.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते म्हणाले की आम्हाला याबाबत माहिती आहे. आम्ही सध्या अधिक भाष्य करणार नाही. सर्व घटनांवर नजर ठेवून आहोत.  वॉशिंग्टनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार  भारतानं एअरस्ट्राईक केल्यानंतर अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या एनएसए आणि विदेश मंत्री मार्को रुबियो यांना फोनवरुन माहिती दिली आहे.  

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी भारतानं मुजफ्फराबाद, कोटली, बहावलपूरमध्ये हल्ले केल्याच्या घटनेला पुष्टी दिली आङे. भारताचं कोणतही विमान किंवा जेट पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये आलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानमध्ये लाहोर आणि सियालकोट विमानतळं पुढील 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहेत. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 17 जण जखमी झालेहोते. पहलगाम दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला झाला होता. भारतानं या हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर द्वारे 7  मे रोजी घेतला आहे .

दरम्यान,  पाकिस्तानी माध्यम संस्थांच्या नुसार भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरमध्ये जामा मशीद सुभानअल्लाहवर देखील एअर स्ट्राइककेला आहे. ही मशीद  जैश-ए- मोहम्मदची हेडक्वार्टर आहे. पाकिस्तानच्या कोटलीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचं प्रशिक्षण केंद्र आहे. मुजफ्फराबादमध्ये लष्कर-ए- तोयबाचं ट्रेनिंग सेंटर आहे.  तर, हिजबुल मुजाहिद्दीनचं हेडक्वार्टर आहे.  ही ठिकाणं हाफिज सईद आणि मसूद अजहरचे अड्डे आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले पाहा

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget