राहुल गांधी यांचे विदेश मंत्री एस जयशंकर यांना व्हिडिओ शेअर करत सवाल, विदेशी मंत्रालय स्पष्टीकरण देत म्हणालं...
Rahul Gandhi S Jaishankar : विदेश मंत्री एस. शंकर यांचा एक व्हिडिओ शेअर करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेश मंत्री एस जयशंकर यांचा एक व्हिडिओ शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली होती. राहुल गांधी यांनी एस. जयशंकर यांच्या वक्तव्या संदर्भात दोन प्रश्न उपस्थित केले होते. तर, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एस. जयशंकर यांच्यावर देशाला धोका दिल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली होती. एस. जयशंकर यांच्या व्हिडिओ संदर्भात विदेश मंत्रालयाचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाकिस्तानला इशारा दिला गेला होता, असं विदेस मंत्रालयानं म्हटलं.
विदेश मंत्रालयनं स्पष्टीकरणात काय म्हटलं?
विदेश मंत्रालयाच्या हवाल्यानं एएनआयनं म्हटलं की, "विदेश मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलेलं की आम्ही पाकिस्तानला सुरुवातीलाच इशारा दिला होता, जो स्पष्टपणे ऑपरेशन सिंदूर सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यातील आहे, ज्याला चुकीच्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर सुरु होण्यापूर्वीचं सांगितलं जात आहे, तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं समोर मांडलं जात आहे".
राहुल गांधी यांचे केंद्र सरकारला सवाल
राहुल गांधी यांनी एस जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले होते. आपण करत असलेल्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला सूचना देणं गुन्हा आहे. विदेश मंत्र्यांनी सार्वजनिक रित्या स्वीकार केलं की भारत सरकारनं असं केलं. राहुल गांधी यांनी यावर प्रश्न उपस्थित केले की " याला कुणी मान्यता दिली? ज्याच्या मुळं आपल्या हवाई दलाची किती विमान गमावली? "
Informing Pakistan at the start of our attack was a crime.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2025
EAM has publicly admitted that GOI did it.
1. Who authorised it?
2. How many aircraft did our airforce lose as a result? pic.twitter.com/KmawLLf4yW
एस जयशंकर यांच्या राजीनाम्याची मागणी
काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत एस जयशंकर यांचा राजीनामा मागितला आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटलं " विदेशी मंत्र्यांनी अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी केलेल्या दाव्याचं उत्तर देखील दिलं नाही, त्यांनी एक रहस्य समोर आणलं आहे. ते आपल्या पदावर कसे राहू शकतात. हे समजण्यापलीकडील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून 2020 चीनला सार्वजनिकपणे क्लीन चिट दिलेली आहे आणि आपल्या चर्चेची स्थिती संपवली. ज्या व्यक्तीला त्यांनी देशाचं विदेश मंत्री केलं आहे त्यांच्या वक्तव्यानं भारताला धोका दिला आहे."

























