एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी, किमती वाढत असताना निर्णय
बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. एप्रिल ते जून या कालावधीत भारताने 19.8 दशलक्ष डॉलर्स कांद्याची निर्यात केली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालय म्हणजेच डीजीएफटीने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यात 30 ते 40 रुपये किमतीने कांद्यांची विक्री होत आहे.
बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. कोरोना संकटात गेल्या काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. एप्रिल ते जून या कालावधीत भारताने 19.8 दशलक्ष डॉलर्स कांद्याची निर्यात केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement