एक्स्प्लोर

5 January In History: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील किल्ला जिंकला, पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना खेळाला गेला; इतिहासात आज

On This Day In History : छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे पेशवे यांनी 5 जानेवारी 1671 रोजी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्ला जिंकून घेतला.

On This Day In History : छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे पेशवे यांनी 5 जानेवारी 1671 रोजी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्ला जिंकून घेतला. साल्हेरवर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराठ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच हा ठार झाला. दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार साल्हेर वाचवण्यासाठी फर्रादपूराहून निघाला, पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली.

1933 : गोल्डन गेट ब्रिजचे बांधकाम सुरू झाले (golden gate bridge)

आजच्याच दिवशी सॅन फ्रान्सिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिजचे  बांधकाम सुरू झाले. 

1934: भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा जन्मदिन (murli manohar joshi)

मुरली मनोहर जोशी यांचा आज जन्मदिन आहे. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1934 रोजी दिल्लीत झाला. 1991 ते 1993 या काळात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये त्यांची केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. मुरली मनोहर जोशी यांना 'पद्मविभूषण' सन्मानही मिळाला आहे.

1941: मन्सूर अली खान पतौडी यांची जयंती (5 जानेवारी 1941 - 22 सप्टेंबर 2011) (mansur ali pataudi)

मन्सूर अली खान पतौडी यांची आज जयंती असून ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान खेळाडू होते. त्यांनी भारतासाठी 46 कसोटी सामने खेळले असून 40 सामन्यांमध्ये ते भारतीय संघाचे कर्णधार होते. यासोबतच ते प्रसिद्ध अभिनेता सेफ अली खान यांचे वडील देखील आहेत.

1955: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जन्मदिन (mamata banerjee birthday)

आज ममता बॅनर्जी यांचा वाढदिवस आहे. राजकीय क्षेत्रात 'दीदी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी झाला. बंगालची राजधानी कोलकाता येथील ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ममता यांनी वयाच्या 15 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. ममता या 17 वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांचे वडील प्रोमिलेश्वर बॅनर्जी यांचे निधन झाले. 1984 साली कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा यांचा प्रभाव करून ममता बॅनर्जी या खासदार म्हणून निवडणून आल्या. ममता बॅनर्जी या सलग तीन वेळा बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. 

1971: क्रिकेट इतिहासातील पहिला एकदिवसीय सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. (first cricket one day match)

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात या दिवसाचे विशेष महत्वाचा आहे. पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना 5 जानेवारी 1971 रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. हा एकदिवसीय सामना 40-40 षटकांचा होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला आणि इंग्लंडच्या जॉन एडरिचने वनडे इतिहासातील पहिला सामनावीराचा पुरस्कार जिंकला.

1982 : सी रामचंद्र यांची पुण्यतिथी (12 जानेवारी 1918 - 5 जानेवारी 1982)

सी रामचंद्र हे  गायक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. ‘अण्णा साहेब’ म्हणून चित्रपटविश्वात प्रसिद्ध होते. 

1986: अभिनेत्री दीपिका पदुकोणचा जन्मदिन (deepika padukone birthday)

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण 5 जानेवारीला तिचा 37 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. दीपिका पदुकोणचा पठाण हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळSupriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Embed widget