एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

9 October In History : जागतिक टपाल दिन, मलाला युसूफझाईवर जीवघेणा हल्ला आणि भारतीय प्रादेशिक सैन्याची निर्मिती, आजचा दिवस इतिहासात  

On This Day In History : मलाला युसूफझाईवर 9 ऑक्टोबर 2012 रोजी तालिबान्यांनी हल्ला केला होता. मलाला त्यावेळी अवघ्या 15 वर्षांची होती. ती त्यावेळी मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती करण्याचं काम करत होती. 

मुंबई : पाकिस्तानच्या मलाला युसूफझाईवर 9 ऑक्टोबर 2012 रोजी तालिबान्यांनी हल्ला केला होता. मलाला त्यावेळी अवघ्या 15 वर्षांची होती. ती त्यावेळी मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती करण्याचं काम करत होती.  पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या मलाला युसुफझाईवर तालिबान्यांनी हल्ला केला आणि गुल मकईच्या नावाने जगभरातील आवाज दाबण्यासाठी तिच्या डोक्यात गोळी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शाळेतून घरी परतणाऱ्या मलालावर झालेला हा हल्ला जीवघेणा होता. पण या जीवघेण्या हल्ल्यातून मलाला बचावली आणि पुढेही तीने आपले काम सुरूच ठेवले.  ब्रिटनमध्ये प्रदीर्घ उपचारानंतर ती बरी झाली. नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण मलाला दहशतवाद्यांच्या मुलांना देखील शिक्षण देण्याच्या बाजूने आहे. टोकियोत 1969 मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे यानिमित्ताने 9 ऑक्टोबरपासून 'पोस्टल विक' पाळला जातो.

 1949 : भारतीय प्रादेशिक सैन्याची निर्मिती
ब्रिटीश शासकाने 'इंडियन टेरिटोरियल अॅक्ट'च्या आधारे भारतीय प्रादेशिक सैन्याच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला होता. परंतु स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांनी भारतीय प्रादेशिक सैन्याची निर्मिती केली.
 
1963 : सैफुद्दीन किचलू यांचे निधन 
 स्वातंत्र्यसैनिक सैफुद्दीन किचलू  हे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी लेनिन पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय होते. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1888 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले आणि केंब्रिज स्कूलमधून बॅचलर डिग्री, लंडनमधून बार अॅट लॉ पदवी आणि जर्मनीमधून पीएचडी मिळवल्यानंतर 1915 मध्ये भारतात परतले. युरोपातून परतल्यावर त्यांनी अमृतसर येथून कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. भारताला स्वातंत्र्या मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला होता. 

1969 : जागतिक टपाल दिन 

लोकांच्या विश्वास संपादन करणाऱ्या पोस्टल सेवेचा 9 ऑक्टोबर हा स्थापना दिवस. हा दिवस जागतिक टपाल दिन किंवा 'वर्ल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जातो.   युनिवर्सल पोस्टल युनियन (युपीयु) ची उभारणी करण्यासाठी 1874 मध्ये स्विर्झलंडची राजधानी 'बर्न' येथे 22 देशांनी मिळून करारावर सही केली होती. 1 जुलै 1876 ला भारत 'युनिवर्सल पोस्टल युनियन' चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. टोकियोत 1969 मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे यानिमित्ताने 9 ऑक्टोबरपासून 'पोस्टल विक' पाळला जातो.

1970 : भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द 
9 ऑक्टोबर 1970 रोजी भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द करण्यात आले. 

1970 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात युरेनियम 233 चे उत्पादन

 भाभा अणुसंशोधन केंद्र  1957 मध्ये मुंबईजवळ ट्रॉम्बे येथे अणुऊर्जा केंद्र म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. 1967 मध्ये त्याचे संस्थापक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या स्मरणार्थ त्याचे नाव बदलून 'भाभा' करण्यात आले. अणु संशोधन केंद्र, BARC'. अणुऊर्जा आणि इतर संबंधित विषयांवर संशोधन आणि विकास कार्यासाठी हे मुख्य राष्ट्रीय केंद्र आहे.  9 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात युरेनियम 233 चे उतपन्न करण्यात आले.  

 1976 : बॉम्बे (आताची मुंबई) आणि लंडन दरम्यान कनेक्टिव्हिटीसह आंतरराष्ट्रीय थेट डायलिंग टेलिफोन सेवा  

बॉम्बे म्हणजे आताची मुंबई आणि लंडन दरम्यान कनेक्टिव्हिटीसह आंतरराष्ट्रीय थेट डायलिंग टेलिफोन सेवा आजच्या दिवशी म्हणजेच  9 ऑक्टोबर 1976 रोजी सुरू करण्यात आली. 
 
1990 :  पहिला स्वदेशी बनावटीचा तेल टँकर 'मोतीलाल नेहरू' भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनला सुपूर्द

कोची शिपयार्डने 1990 मध्ये पहिला स्वदेशी ऑईल टँकर बनवला होता. कोची शिपयार्डने 43 महिन्यांत देशातील पहिला तेल टँकर जगासमोर सादर केला. तेल टँकर कंपनीने मार्च 1987 मध्ये बांधण्यास सुरू केला होता आणि नोव्हेंबर 1989 मध्ये तो पूर्णपणे तयार झाला होता. त्यानंतर 8 ऑक्टोबर 1990 रोजी पहिला स्वदेशी बनावटीचा तेल टँकर 'मोतीलाल नेहरू' भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनला सुपूर्द करण्यात आला.  

 1991 : सुमो कुस्तीच्या 1500 वर्षांच्या इतिहासात प्रथमच जपानबाहेर त्याचे आयोजन करण्यात आले  

सुमो कुस्तीच्या 1500 वर्षांच्या इतिहासात प्रथमच जपानबाहेर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये लंडनमधील प्रसिद्ध रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये जपान फेस्टिव्हल अंतर्गत या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

1997 : इटालियन लेखक डारियो फो यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला  
 इटालियन लेखक डारियो फो यांना 1997 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.  डारियो फो यांचा जन्म 24 मार्च 1926 रोजी झाला होता. त्यांनी 1950 च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 80 हून अधिक नाटके लिहिली.  त्यांना 'अ‍ॅक्सिडेंटल डेथ ऑफ अॅनार्किस्ट' आणि 'मायस्टेरो बुफो' सारख्या नाटकांसाठी ओळखले जाते. मिस्टेरो बुफोमध्ये राजकारण आणि धर्मावर विनोदी पद्धतीने टीका करण्यात आली.  व्हॅटिकनच्या प्रवक्त्याने या नाटकाला "टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात निंदनीय नाटक म्हटले.  त्यांना 1997 मध्ये साहित्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.

 2004  : अफगाणिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांनी आपल्या पसंतीचा राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदानात भाग घेतला

आजच्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबर 2004 रोजी अफगाणिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांनी आपल्या पसंतीचा राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदानात भाग घेतला. निवडणुकीत हमीद करझाई विजयी झाले. 2001 मध्ये देशात तालिबानच्या पतनानंतर करझाई यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून काम केले.

2006 :  बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशी राम यांचे निधन 
कांशीराम हे एक भारतीय राजकारणी होते. त्यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पक्षाने  1995 साली उत्तर प्रदेशात विधानसभेत मोठा विजय मिळवत मायावती यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन केले.

 2012 : मलाला युसूफझाईवर हल्ला  

पाकिस्तानच्या मलाला युसूफझाईवर 9 ऑक्टोबर 2012 रोजी तालिबान्यांनी हल्ला केला होता. मलाला त्यावळी अवघ्या 15 वर्षांची होती. ती त्यावेळी पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती करण्याचं काम करत होती.  पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या मलाला युसुफझाईवर तालिबान्यांनी हल्ला केला आणि गुल मकईच्या नावाने जगभरातील आवाज दाबण्यासाठी तिच्या डोक्यात गोळी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शाळेतून घरी परतणाऱ्या मलालावर झालेला हा हल्ला जीवघेणा होता. पण या जीवघेण्या हल्ल्यातून मलाला बचावली आणि पुढेही तीने आपले काम सुरूच ठेवले.  ब्रिटनमध्ये प्रदीर्घ उपचारानंतर ती बरी झाली. नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण मलाला दहशतवाद्यांच्या मुलांना देखील शिक्षण देण्याच्या बाजूने आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Embed widget