एक्स्प्लोर

27 November In History : माजी पंतप्रधान व्ही. पी सिंह यांचे निधन, लेखक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म; आजच्या दिवशी नेमकं काय-काय घडलं

Today Dinvishesh: आज म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर 2008 रोजी भारताचे दहावी पंतप्रधान व्ही. पी सिंह यांचे निधन झाले.

On This Day In History : 27 नोव्हेंबर हा दिवस इतिहासात अनेक महत्वाच्या घटनांनी नोंद आहे. आजच्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर 2008 रोजी भारताचे दहावी पंतप्रधान व्ही. पी सिंह यांचे निधन झाले. 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भुषवले. प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म  27 नोव्हेंबर 1907 रोजी झाला. याबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना याचा जन्म 27 नोव्हेंबर 1986 रोजी झाला. शिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजचा एका सामन्यादरम्यान डोक्याला बाउन्सर लागल्याने आजच्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबर 2014 रोजी मृत्यू झाला होता.  याआधीही विविध देशांच्या खेळाडूंना फलंदाजी करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये भारताचा फलंदाज रमन लांबाचा समावेश आहे. चार कसोटी आणि 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रमण लांबा यांचा 1998 मध्ये ढाका येथे क्लब सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला होता. यासह आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1795 : कलकत्ता येथील एजरा स्ट्रीट येथे बंगाली नाटक प्रथमच सार्वजनिकरित्या सादर करण्यात आले 

बंगाली रंगभूमीला दोनशेहून अधिक वर्षांचा दीर्घ आणि समृद्ध इतिहास आहे. बंगालमध्ये 1795 मध्ये थिएटर सुरू झाले. अठराव्या शतकातील एका वृत्तपत्राच्या जाहीरातीवरून लक्षात येते की, रशियन रंगमंच कलाकार जेरोमिस स्टेपनोविच लीबेडेफ 1795 मध्ये मद्रासहून कलकत्त्याला आला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये डोमतला येथे इमॅजिनरी सावदल नावाचे नाटक केले. त्या तात्पुरत्या सभागगृहाला बंगाली थिएटर असे नाव देण्यात आले आणि त्या नाटकात फक्त बंगाली कलाकारांनीच अभिनय केला.  

 1895 : नोबेल पारितोषिकांची सुरूवात

आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल, एक स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योगपती यांनी त्यांच्या मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली. ज्यामुळे नोबेल पारितोषिकांची सुरूवात झाली आणि 1901 मध्ये पहिले नोबेल पारितोषिक देण्यात आले. आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट आणि इतर अनेक शक्तिशाली स्फोटकांचा शोध लावला.
 
1907 : प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म 

 प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांचा जन्म  27 नोव्हेंबर 1907 रोजी झाला. आजची पिढी त्यांना अमिताभ बच्चन यांचे वडील म्हणून ओळखत असेल, पण हिंदी साहित्यातील त्यांचे योगदान नेहमीच कौतुकास्पद राहील.  हरिवंश राय यांनी 1938 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए केले आणि 1952 पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम केले.  1952 मध्ये पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले, तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात इंग्रजी साहित्य/कवितेवर संशोधन केले. 1955 मध्ये केंब्रिजहून परत आल्यानंतर त्यांची भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी तज्ञ म्हणून नियुक्ती झाली. ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य देखील होते. 1976 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पूरस्कार मिळाला. त्याआधी त्यांना 1968 मध्ये 'दो चटणें' (कविता संग्रह) साठी साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. हरिवंशराय बच्चन यांचे 18 जानेवारी 2003 रोजी मुंबईत निधन झाले.

1948 : राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना

राष्ट्रीय छात्र सेना ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्र सेवा संघटना आहे. 27 नोव्हेंबर 1948 रोजी विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे.
 
1975 : बीबीसीचे कार्यक्रम सादरकर्ते प्रेझेंटर रॉस मॅकक्वेस्टर यांची गोळ्या झाडून हत्या 

 बीबीसीचे कार्यक्रम सादरकर्ते प्रेझेंटर रॉस मॅकक्वेस्टर यांची 27 नोव्हेंबर 1975 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक म्हणूनही ओळखले जाते.

1940 :  अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट मास्टर ब्रूस लीचा जन्म

 अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट मास्टर ब्रूस ली याचा 27 नोव्हेंबर 1940 रोजी जन्म झाला.  सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जन्मलेला आणि हाँगकाँगमध्ये वाढलेला ब्रूस हा मार्शल आर्टमध्ये मास्टर होता.  70 च्या दशकात त्याने अनेक मार्शल आर्ट चित्रपटांमध्ये काम केले आणि जगभरात या कलेचा प्रसार केला. 

1944 : एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात  स्फोट होऊन 40 जण ठार

दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध  युरोप आणि आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. याच महायुद्धात रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात 27 नोव्हेंबर 1944 रोजी स्फोट होऊन 40 जण ठार झाले.

1986 : भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचा वाढदिवस 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना याचा जन्म 27 नोव्हेंबर 1986 रोजी झाला. सुरेश रैनाने 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 615 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके, 36 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, रैनाने 78 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 1 हजार 604 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच सुरेश रैनाने 193 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 5 हजार 368 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक, 38 अर्धशतक केले आहेत. त्याने 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  
 
2001 : हबल दुर्बिणीने सूर्यमालेच्या बाहेरील ओसायरिस ग्रहावर हायड्रोजन समृद्ध वातावरण शोधले

हबल दुर्बिणीने 27 नोव्हेंबर 2001 रोजी सूर्यमालेच्या बाहेरील ओसायरिस ग्रहावर हायड्रोजन समृद्ध वातावरण शोधले. असे वातावरण असलेला हा सौरमालेबाहेरील पहिला ग्रह आहे.

 2005 : जगातील पहिले यशस्वी आंशिक चेहरा प्रत्यारोपण

 फ्रान्समधील इसाबेल डिनोरे या महिलेचे जगातील पहिले यशस्वी आंशिक चेहरा प्रत्यारोपण 27 नोव्हेंबर 2005 रोजी झाले. 

 2008 :  भारताचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचे निधन 

विश्वनाथ प्रताप सिंह हे भारताचे दहावे पंतप्रधान होते. 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधानपद भुषवले.  त्यांचा जन्म 25 जून 1931 रोजी  अलाहाबाद जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. त्यांनी कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल, देहरादून येथून शिक्षण घेतले आणि अलाहाबाद विद्यापीठातून कला व कायदशास्त्राची पदवी घेतली. ते अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि नंतर पुणे विद्यापीठाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली. सिंह हे 19969 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेवर सोरांव येथून काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडून गेले. 1971 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि 1974 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाणिज्य उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली.  

2013 : जगातील सर्वाधिक कमाई करणारा अॅनिमेशन चित्रपट 'फ्रोझन' रिलीज झाला 

जगातील सर्वाधिक कमाई करणारा अॅनिमेशन चित्रपट 'फ्रोझन' रिलीज झाला. फ्रोझन  हा एक संगणक-अ‍ॅनिमेटेड संगीतमय कल्पनारम्य चित्रपट आहे. वॉल्ट डिझ्नी अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित हा चित्रपट वॉल्ट डिझनी पिक्चर्सने 2013 मध्ये प्रदर्शित केला. हा 53 वा डिझ्नी अ‍ॅनिमेटेड फीचर चित्रपट असून हान्स ख्रिश्चन अँडरसनच्या "द स्नो क्वीन" या परीकथेवरून हा चित्रपट प्रेरित आहे. फ्रोझनने 86 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार आणि इतर अनेक महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत. त्याच्या थिएटर रन दरम्यान, चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिस कमाईत  1.280 अब्ज डॉलर कमाई करून एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक यश मिळवले. टॉय स्टोरी 3ला मागे टाकत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट बनला आणि 2019 मध्‍ये द लायन किंग मागे टाकेपर्यंत त्याचे स्थान कायम होते. 

 2014 :  ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलीप ह्यूजचा बाऊन्सर लागून मृत्यू झाला
क्रिकेटच्या खेळात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दररोज बनवलेल्या विक्रमांची खूप चर्चा होते. परंतु कधीकधी असे काहीतरी घडते ज्याची इतिहासात वेगळी नोंद होते. 27 नोव्हेंबर 2014 रोजी अशीच घटना घडली होती. ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलिप ह्यूजचा एका सामन्यादरम्यान डोक्याला बाउन्सर लागल्याने मृत्यू झाला होता.  याआधीही विविध देशांच्या खेळाडूंना फलंदाजी करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये भारताचा फलंदाज रमन लांबाचा समावेश आहे. चार कसोटी आणि 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रमण लांबा यांचा 1998 मध्ये ढाका येथे क्लब सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला होता. 

2019 : भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल सुशील कुमार यांचे निधन  

भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल सुशील कुमार यांचे 27 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झाले. ते  1998 ते 2000 दरम्यान भारतीय नौदलाचे प्रमुख होते. सुशील कुमार यांनी 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्धही केले होते. गोवा मुक्तिसंग्रामातही त्यांचा सहभाग होता. त्यांचे युद्धकौशल्य पाहून त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक देण्यात आले. 

 2019 : भारताच्या कार्टोसॅट-3 उपग्रहाचे पृथ्वीची अतिशय स्पष्ट छायाचित्रे घेण्यासाठी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले 

ISRO ने 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 9.28 वाजता श्रीहरिकोटा बेटावरील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC SHAR) च्या लॉन्चपॅड-2 वरून कार्टोसॅट-3 उपग्रह प्रक्षेपित केला. कार्टोसॅट-3 उपग्रह PSLV-C47 (PSLV-C47) रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला. कार्टोसॅट-3 पृथ्वीपासून 509 किमी उंचीवर फिरला.  
 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 17 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सSaif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Embed widget