एक्स्प्लोर
टोल, दिल्ली मेट्रो, पेट्रोल पंपवर जुन्या नोटा घेणार
नवी दिल्ली : 500, 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता नव्या पाचशेच्या आणि दोन हजाराच्या नोटा 11 नोव्हेंबरपर्यंत एटीएममध्ये उपलब्ध होणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
टोल नाक्यांवरील सुट्ट्या पैशांचा वाद पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही टोल नाक्यांवर 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरात टोल नाक्यांवर जुन्या नोटा नाकारल्याने वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
यानंतर दिल्ली मेट्रोलाही जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दिल्ली मेट्रो जुन्या नोटा घेणार आहे.
अचानक नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पेट्रोल पंप, एटीएम, टोल या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. टोल नाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही सर्व पेट्रोल पंप डीलर्स आणि वितरकांना सुट्टे पैसे उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
मोदींचा सर्जिकल स्ट्राईक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा : नरेंद्र जाधव
दोन हजारच्या नोटबद्दलच्या अफवा आणि सत्य
तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?
RBI कडून 500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या 26 प्रश्नाची उत्तरं
नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार
शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1000 अंकांनी गडगडला
500,1000च्या नोटांसंबंधी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!
नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला
एकच फाईट, वातावरण ताईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी
टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप
आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक
देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प
कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement