एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोल पंपावर पेटलेला टँकर 5 किमी घेऊन पळाला, मोठी दुर्घटना टळली
पेट्रोल पंपावर पेट्रोल खाली करत असतानाच टँकरला अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने टँकर जागेवरुन हलवला आणि शहरापासून दूर नेला.
भोपाळ : मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये एका चालकाने आपले प्राण पणाला लावत मोठी दुर्घटना टाळली. गोटेगाव शहरात खरया पेट्रोल पंपावर पेट्रोल खाली करत असतानाच टँकरला अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने टँकर जागेवरुन हलवला आणि शहरापासून दूर नेला.
टँकरमधून आगीचा धूर निघताच चालक साजिद खान यांनी मोठ्या हिंमतीने टँकर पेट्रोल पंपाहून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर नेला आणि शहरातील मोठी दुर्घटना टाळली.
दरम्यान, पेटलेला टँकर रस्त्याने नेताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना याची झळ बसली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकर नेताना चालक साजिद यांना दुखापत झाली. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.#WATCH A petrol tanker caught fire while it was being emptied at a petrol pump in MP's Narsinghpur. In an attempt to save lives, the truck driver drove the burning truck to a location away from the petrol pump. Truck driver suffered burns, admitted to hospital (25 March) pic.twitter.com/YBchJ5YsZh
— ANI (@ANI) March 26, 2018
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. साजिदच्या या प्रसंगावधानाचं मोठं कौतुक होत आहे. टँकर पेट्रोल पंपावरच उभा ठेवला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.#WATCH Truck driver Sajid who drove a burning petrol tanker truck away from a petrol pump in an attempt to save lives on 25th March, in Madhya Pradesh's Narsignhpur (Mobile phone footage, quality as incoming) pic.twitter.com/LfhZenBulW
— ANI (@ANI) March 26, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement