एक्स्प्लोर

Odisha Tragedy : ओडिशा दुर्घटनेनंतर हजारो प्रवाशांकडून रेल्वे तिकीटे रद्द, काँग्रेसचा दावा; IRCTC ने सांगितले सत्य

 काँग्रेसने दावा केला होता की, ओडिशात झालेल्या  रेल्वे अपघातानंतर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भीतीमुळे अनेक प्रवासी रेल्वे तिकिटे रद्द करत आहेत. यासंदर्भात IRCTC खरी परिस्थिती सांगितली आहे. 

Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasor) येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. हा अपघात घडवून आणला आहे असेही म्हणले जात आहे. तसेच या दुर्घटनेला जातीय रंग देण्याचा ही प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर अनेक लोक विविध दावे करत आहेत. अशातच काँग्रेसने ट्वीट (Tweet) केले, ज्यात त्यांनी दावा केला आहे की, रेल्वे अपघातानंतर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भीतीमुळे अनेक प्रवासी आपले रेल्वे तिकिटे रद्द करत आहेत. यावर IRCTC ने उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा दावा चुकीचा असल्याचं आयआरसीटीसीने म्हटलं आहे.

IRCTC ने काय सांगितले? (What IRCTC Said)

IRCTC ने सांगितले आहे की, काँग्रेसने केलेला दावा हा चुकीचा आहे. याउलट प्रवासी तिकीट रद्द करत नाहीत तर 1 जून रोजी तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या 7.7 लाख होती जी 3 जून रोजी 7.5 लाख इतकी झाली आहे.

काँग्रेसने काय दावा केला होता?

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सोमवारी संध्याकाळी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते भक्त चरण दास म्हणाले होते की, "असा रेल्वे अपघात यापूर्वी कधीही झाला नव्हता. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला तर हजारांहून अधिक लोक जखमी झाले. ही अतिशय दु:खद घटना आहे. अपघातानंतर भीतीमुळे हजारो लोकांनी तिकीटे रद्द केली आहेत. ट्रेनमधून प्रवास करणं त्यांना सुरक्षित वाटत नाही." यावर IRCTC ने वरील उत्तर दिले.

काँग्रेसने आता मोदी सरकारला घेरले आहे.

काँग्रेसने (Congress) या घटनेवरुन मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, सुमारे 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि आजही या मृत्यूंना कोण जबाबदार आहे याचे उत्तर नाही? या देशातील सामान्य माणूस रेल्वेने प्रवास करतो. उद्या तुम्ही, तुमचे कुटुंब आणि देशातील जनता ट्रेनमध्ये प्रवास कराल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही हा प्रवास तुमच्या जबाबदारीवर करत आहात, यात सरकारची कोणतीही जबाबदारी नाही. ते पुढे म्हणाले, रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारन राजीनामा द्यावा, लक्ष वळवण्यासाठी नवनवीन थेअरी तयार केल्या जात आहेत. या सरकारमध्ये जबाबदारीचा 'ज' ही नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

Indian Railways : भारतीय रेल्वेने 2017-2022 दरम्यान सुरक्षेवर एक लाख कोटी खर्च केले, कागदपत्रांमधून माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्या

गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार, तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा खर्च, गुजरात ते ओमानपर्यंत थेट पाइपलाईन
गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार, तब्बल 40 हजार कोटी रुपयांचा खर्च, गुजरात ते ओमानपर्यंत थेट पाइपलाईन
UPSC Date Extended : 'यूपीएससी'कडून NDA आणि CDS परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करा
'यूपीएससी'कडून NDA आणि CDS परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करा
NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
NDA II परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी UPSC चे सर्व्हर डाऊन, हेल्पलाईन डेस्कही बंद; विद्यार्थ्यांची तक्रार, मुदतवाढीची मागणी
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा ग्राहकांना दणका, व्याजदरात वाढ, गृहकर्ज आणि वाहन कर्ज अधिक महाग
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा ग्राहकांना दणका, व्याजदरात वाढ, गृहकर्ज आणि वाहन कर्ज अधिक महाग

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
Embed widget