एक्स्प्लोर
VIDEO : चपलांचे बक्कल लाव, मंत्र्याचं सुरक्षा अधिकाऱ्याला फर्मान

भुवनेश्वर : झेंडावंदनानंतर वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याला (पीएसओ) चपलांचे बक्कल लावण्याचं फर्मान सोडणाऱ्या मंत्री महोदयांवर टीकेची झोड उठली आहे. ओदिशाचे मंत्री योगेंद्र बेहरा यांनी केंदुझारमधील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर हे कृत्य केल्याची माहिती आहे. एएनआयने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित सुरक्षा अधिकारी खाली वाकून बेहरा यांच्या सँडल्सचे बक्कल लावताना दिसत आहे. विशेष म्हणजे 'मी व्हीआयपी आहे' असं म्हणत निलाजरेपणाने आपल्या कृत्याचं समर्थनही केलं आहे. यापूर्वी पश्चिम बंगालचे मंत्री राचपाल सिंग यांनी पोलिस अधिकाऱ्याला शूलेस बांधायला लावल्याचं मे 2015 मध्ये समोर आलं होतं. त्यावेळी विरोधीपक्षातील नेत्यांनी हा माणुसकीचा अपमान असल्याची टीका केली होती. https://twitter.com/ANI_news/status/765364634119397376 https://twitter.com/ANI_news/status/765364915083309057
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक























