एक्स्प्लोर
5600 कोटींचा NSEL घोटाळा : FTIL च्या जिग्नेश शाहांना अटक
मुंबई : 5600 कोटी रुपयांच्या एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी एफटीआयएलचे संस्थापक जिग्नेश शाह यांना अंमलबजावणी संचालयानालयाने मंगळवारी अटक केली. आज त्यांना न्यायालयात सादर केलं जाणार आहे.
एफटीआयएल म्हणजेच फायनान्शियल टेक्नोलॉजीस इंडिया लिमिटेड या कंपनीने नॅशनल स्पॉट एक्स्चेंजमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यानुसार एफटीआयएलचे प्रमुख जिग्नेश शाह यांना अटक केली आहे. जिग्नेश शाह हे कोट्यवधी रुपयांच्या एनएसईएल घोटाळ्याच्या चौकशीत सहकार्य करत नसल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
मंगळवारी दुपारी त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना अटक केल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं. त्यांना आज विशेष ईडी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
ईडीने गेल्यावर्षी या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात जिग्नेश शाह यांचाही समावेश होता.
जिग्नेश शाह यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देण्यासाठी एफटीआयएलने जारी केलेल्या निवेदनात मात्र शाह यांच्या अटकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हटलं आहे. शाह आणि संपूर्ण कंपनी तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून लवकरच एफटीआयएलच्या प्रॉपर्टीची जप्ती होणार असल्याची शक्यता आहे. या कारवाईविषयी अर्थ मंत्रालयाला पूर्व कल्पना देण्यात आल्याचंही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात एफटीआयएल आणि अन्य 67 जणांविरोधात तब्बल 20 हजार पानाचं आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. एनएसईएलने या घोटाळ्यातून मिळवलेल्या पैशातून अनेक ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्याचा दावाही या आरोपपत्रात करण्यात आला आहे. या प्रॉपर्टींवरही टाच येण्याची शक्यता आहे.
एनएसईएलच्या 5600 कोटी रूपयांच्या घोटाळ्यांपैकी 3721 कोटी रुपयांचा माग घेण्यात यश आल्याचा दावा ईडीने केला आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा तपास केला आहे. त्याच बरोबर ईडीनेही स्वतंत्रपणे या घोटाळ्याचा तपास सुरु केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement