एक्स्प्लोर
51 औषधांच्या किमतींमध्ये तब्बल 53 टक्क्यांनी कपात
गोवरच्या लसीच्या किंमतीतही मोठी कपात करण्यात आलीय.
नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध किंमत नियामक प्राधिकरणाने (एनपीपीए) महत्वाच्या अशा 51 औषधांच्या किमतीत 53 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कॅन्सर, हृदयविकारासंबंधी, पेनकिलर आणि त्वचासंबंधी रोगांवरील औषधांच्या किमतीत 6 टक्क्यांपासून 53 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. गोवरच्या लसीच्या किंमतीतही मोठी कपात करण्यात आलीय.
एनपीपीएने 13 प्रकारच्या औषधांसाठी कमाल किंमत निश्चित केली आहे. तर 15 औषधांच्या कमाल किंमतीमध्ये बदल केला आहे. शिवाय 23 महत्त्वाच्या औषधांच्या ठोक किंमतीतही बदल केला आहे. या निर्णयामुळे काही औषधांच्या किंमती निम्म्यावर येतील.
एनपीपीएने 2013 च्या डीपीसीओच्या (राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरण) आदेशानुसार या औषधांच्या किंमतीत बदल केला आहे. दरम्यान जी औषधं दर नियंत्रणाच्या बाहेर आहेत, त्या निर्मात्यांनाही वर्षाला 10 टक्क्यांपेक्षा जास्त किंमत वाढवण्याची परवानगी नाही.
सरकारने एनपीपीएची स्थापना 1997 साली केली होती. औषधांच्या किंमती ठरवणं, किंमतींवर नियंत्रण ठेवणं आणि डीपीसीओच्या नियमांची अंमलबजावणी करणं या कामांची जबाबदारी एनपीपीएवर सोपवण्यात आलेली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement