एक्स्प्लोर

गोव्यात आता दुचाकी अॅम्ब्युलन्स!

दुचाकी अॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजन सिलिंडर व अन्य प्राथमिक उपकरणे आहेत. एखाद्या अपघातग्रस्ताला दहा मिनिटांत प्रथमोपचार देता यावेत अशी व्यवस्था केली गेली आहे.

पणजी (गोवा) : राज्यात कुठेही अपघात घडल्यानंतर जखमींपर्यंत दहा मिनिटांत पोहचता यावे व त्यास प्रथमोपचार देण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आरोग्य खात्यातर्फे आज 20 दुचाकी अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन करण्यात आले. येत्या वर्षी अशा प्रकारच्या शंभर अॅम्ब्युलन्स गोव्यातील रस्त्यांवरुन धावतील एवढी व्यवस्था केली जाणार आहे. ईएमआरआर 108 अॅम्ब्युलन्स सेवेखाली गोव्यातील रस्त्यांवरुन रुग्णवाहिका धावतात. आता 108 सेवेखालीच 20 दुचाकी अॅम्ब्युलन्सही रस्त्यावरुन धावणार आहेत. आज या सेवेला आरंभ झाला. फस्ट रिस्पॉन्स अॅम्ब्युलन्स म्हणून त्या ओळखल्या जातात. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या आधुनिक पद्धतीच्या दुचाकी अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन करण्यात आले. पर्वरी येथील सचिवालयाजवळ उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. दुचाकी अॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजन सिलिंडर व अन्य प्राथमिक उपकरणे आहेत. एखाद्या अपघातग्रस्ताला दहा मिनिटांत प्रथमोपचार देता यावेत अशी व्यवस्था केली गेली आहे. केवळ 20 अॅम्ब्युलन्स पूर्ण गोव्यासाठी पुरेशा नाहीत. उसगावमधील एक कंपनीही आणखी 25 दुचाकी अॅम्ब्युलन्स पुरस्कृत करणार आहे. एकूण 100 दुचाकी येत्या वर्षी गोव्यातील रस्त्यांवरुन धावतील असे जाहीर करण्यात आले. आरोग्य खात्याचे तसेच ईएमआरआर सेवेचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून व हिरवा बावटा दाखवून दुचाकी अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन केले गेले. एका दुचाकी अॅम्ब्युलन्सच्या खरेदीसाठी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येतो. दुचाकीस्वारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुचाकीवरून रुग्णाला आणले जाणार नाही, पण प्रथमोपचार तातडीने मिळाल्यानंतचार चाकी अॅम्ब्युलन्समध्ये घालून रुग्णाला इस्पितळात नेले जाईल. मुख्यमंत्री पर्रिकर म्हणाले, की वाहतूक कोंडीची समस्या, अरुंद रस्ते तसेच अन्य समस्यांवर मात करत दुचाकी अॅम्ब्युलन्स अपघातग्रस्त रुग्णापर्यंत लवकर पोहचतील. मोठ्या अॅम्ब्युलन्स पोहचण्यास काहीवेळा विलंब लागतो. तोर्पयत दुचाकी घटनास्थळी पोहचतील. केवळ किनारी भागातच नव्हे तर सगळीकडेच दुचाकी अॅम्ब्युलन्सची गरज असते. जिथे जास्त अपघात होतात अशा ठिकाणी प्रथम दुचाकी अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या जातील.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget