एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पॅन कार्ड मिळणार क्षणार्धात, तर प्राप्तीकर भरण्यासाठीही नवं अॅप लवकरच
नवी दिल्ली: आता तुम्हाला तुमचं पॅन कार्ड काही क्षणात मिळणार असून, तुम्ही तुमचा टॅक्स मोबाईलच्या माध्यमातून भरु शकणार आहात. कारण अर्थमंत्रालय आणि प्राप्तीकर विभाग करदात्यांचा त्रास कमी करण्यासाठी लवकरच नवं मोबाईल अॅप लॉन्च करणार आहे. तसेच पॅन कार्डही तत्काळ उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रकल्पावर काम सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डायरेक्टोरेट ऑफ सिस्टीमच्या देखरेखीखाली केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) या दोन्ही उपक्रमांवर काम करत आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
यासाठी सीबीडीटीने आधारच्या ई-केवायसीच्या सुविधेचा वापर करुन, काही क्षणातच पॅन कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी सीबीडीटी आणि कॉर्पोरेट मंत्रालयाने एका नव्या कंपनीला केवळ एका अर्जच्या माध्यमातून चार तासांच्या आत पॅन कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी करार केला आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर ई-केवायसीच्या माध्यमातून सिमकार्ड देता येऊ शकते, तर त्याचमाध्यमातून पॅन कार्डही देता येऊ शकतं. त्यामुळं सध्या ज्या व्यक्तीला पॅन कार्ड मिळण्यासाठी दोन ते तीन आठवड्याचा कालावधी लागत होता. ते काम तत्काळ पूर्ण होत असल्याने पाच ते सहा मिनिटात त्या व्यक्तीला पॅन कार्ड उपलब्ध करुन देणे शक्य होईल.
याशिवाय प्राप्तीकर विभाग एक नवं स्मार्टफोन अॅप ही विकसित करत असून, याच्या माध्यमातून ऑनलाईन टॅक्स भरण्याच्या प्रक्रियेला हातभार लागणार आहे. या नव्या अॅपमध्ये पॅन कार्डसाठी तुम्हाला अर्ज करणे, आपल्या प्राप्तीकराच्या विवरणपत्राची ताजी माहिती मिळवणे आदी सर्व या अॅपवर उपलब्ध असेल.
दरम्यान, प्राप्तीकर विभाग आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध करुन देत असलं, तरी या अॅपच्या माध्यमातून या सुविधांमध्ये भरच पडणार असल्याचं आयकर विभागचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या: पॅन कार्ड आता नव्या रुपात येणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
मुंबई
निवडणूक
Advertisement