एक्स्प्लोर

टाटा समूहाच्या कोणत्याही पदासाठी उत्सुक नाही : सायरस मिस्त्री

एनसीएलएटी म्हणजेच कंपनी लवादाने सायरस मिस्त्री यांच्या बाजुने निकाल देत पुन्हा टाटा सन्सचे संचालक बनवण्याचे आदेश दिले होते. याविरोधात टीसीएसने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : टाटा समुहामध्ये परत जाण्याची इच्छा नसल्याचं सायरस मिस्त्री म्हणाले आहेत. एनसीएलएटी म्हणजेच कंपनी लवादाने सायरस मिस्त्री यांच्या बाजुने निकाल देत पुन्हा टाटा सन्सचे संचालक बनवण्याचे आदेश दिले होते. याविरोधात टीसीएसने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिस्त्री म्हणाले की, त्यांनी नेहमीच कंपनीच्या कामकाजामधील उत्कृष्ट मानकांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले, टाटा समूहाचे हित कोणत्याही व्यक्तीच्या किंवा माझ्या स्वतःच्या हितसंबंधांपेक्षा महत्वाचे आहे. सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीवर स्थगिती आणण्याची मागणी या याचिकेतून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन झालेली हकालपट्टी बेकायदेशीर असून पुन्हा कंपनीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने (एनसीएलएटी) आदेश दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचा आणि शेअरधारकांचा मिस्त्री यांच्यावर विश्वास राहिला नाही, असे सांगून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. टा उद्योग समूहाची धारक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्टोबर 2016 साली तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. अवघ्या 42 व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना चार वर्षातच भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले हे बघून सर्वांनाच धक्का बसला होता. एनसीएलटी ने आज दिलेल्या निर्णयानुसार सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय चुकीचा आहे. सायरस मिस्त्री टाटा सन्स समूहाचे सहावे अध्यक्ष होते. 2012 साली रतन टाटा यांच्यानंतर मिस्त्री यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला होता.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget