एक्स्प्लोर
महाराष्ट्रातील अमराठी खासदारांकडून मराठीत शपथ, विखे, सुळे, उदयनराजेंना वावडं का?
इम्तियाज जलील आणि नवनीत कौर राणा यांनी अमराठी भाषिक असूनही मराठीतून शपथ घेतली, मात्र सुप्रिया सुळे यांनी हिंदी, तर सुजय विखे पाटील आणि उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली
नवी दिल्ली : नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी काल संसदेत पार पडला, त्यावेळी महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी 34 खासदारांनी मराठीतून शपथ घेतली, तीन खासदारांनी संस्कृत भाषेतून खासदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी अमराठी भाषिक असूनही मराठीतून शपथ घेतली, मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हिंदी, तर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना इंग्रजीतून शपथ घेण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
#मराठीतशपथ हे अभियान सोशल मीडियावर सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या बहुतांश खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेण्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर 48 खासदारांपैकी 34 खासदारांनी काल मराठीतून शपथ घेतली. शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 18 खासदारांनी, तर भाजपच्या 11 खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. यामध्ये भाजपचे अमराठी खासदार मनोज कोटक यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुनिल तटकरे, राष्ट्रवादी पुरस्कृत खासदार नवनीत कौर राणा आणि एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांनीही मराठीतून शपथ घेतली.
#मराठीतशपथ मोहिमेला 'एबीपी माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी
दुसरीकडे, भाजपचे उन्मेश पाटील, सुनिल मेंढे आणि गिरीश बापट यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. गीर्वाणवाणी मानल्या जाणाऱ्या संस्कृतमधून शपथ घेणंही कौतुकास्पद मानलं गेलं. मात्र पाच खासदारांनी संसदेत हिंदीतून तर दोघा खासदारांनी इंग्रजीतून शपथ घेतली. भाजपच्या हीना गावित, पूनम महाजन, सुधाकर शृंगारे या मराठमोळ्या खासदारांसह गोपाळ शेट्टी यांनी हिंदीतून शपथ घेतली. तर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना इंग्रजीतून शपथ घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अमराठी असूनही मराठीत शपथ
नवनीत राणा (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष)
इम्तियाज जलील (एमआयएम)
मनोज कोटक (भाजप)
हिंदी भाषेत शपथ
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
पूनम महाजन (भाजप)
हीना गावित (भाजप)
सुधाकर श्रुंगारे (भाजप)
गोपाळ शेट्टी (भाजप)
इंग्लिशमधून 'ओथ' घेणारे 'एमपी'
सुजय विखे पाटील (भाजप)
उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
संस्कृतमधून शपथ
सुनील मेंढे (भाजप)
गिरीश बापट (भाजप)
उन्मेश पाटील (भाजप)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement