एक्स्प्लोर

गोरखपूरमध्ये एकही कत्तलखाना का नाही? कोर्टाचा योगी सरकारला सवाल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं शहर गोरखपूरमध्ये एकही कत्तलखाना नसल्यामुळे अलाहाबाद हायकोर्टाने सरकारकडून उत्तर मागवलं आहे. कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला याबाबत नोटीस पाठवून तीन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. गोरखपूरच्या महापालिका आयुक्तांना 7 जुलैला कोर्टात उपस्थित राहून यावर स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. प्रत्येकाला आवडीचं खाण्याचा अधिकार आहे. तरीही सरकारी नियमांनुसार चालू असलेल्या कत्तलखान्यांवरही बंदी का, असा सवाल कोर्टाने केला आहे. गोरखपूर शहरातील कत्तलखान्यांबाबतीत 120 याचिका कोर्टात दाखल झाल्या होत्या. यावर सुनावणी देताना कोर्टाने महापालिका आयुक्तांकडून उत्तर मागवलं. सर्वांची एकच मागणी असल्यामुळे कोर्टाने या याचिकेवर सुनावणी केली. अनधिकृत कत्तलखान्यांवर बंदी आणणं योग्यच आहे. पण मॉडर्न कत्तलखाने उभारुन त्यासाठी परवाना प्रक्रिया सुरु न करणं चूक आहे. हे लोकांच्या खाण्याच्या अधिकारावर बाधा आणण्यासारखं असल्याची टिप्पणी कोर्टाने केली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने निवडणुकीमध्येच अवैध कत्तलखान्यांचा मुद्दा लावून धरला होता. भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल त्यादिवशी रात्री 12 वाजल्यापासून अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरु होईल, असं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट सांगितलं होतं. भाजपने प्रचारातील हा शब्द पाळत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचा धडाका लावला. अनेक ठिकाणचे अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले. मात्र योगी आदित्यनाथ यांचं शहर गोरखपूरमध्ये कत्तलखान्यांची सफाई मोहिम एवढी तीव्रतेने राबवण्यात आली की, वैध कत्तलखानेही बंद करण्यात आल्याचा आरोप आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget