एक्स्प्लोर
समझोता बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितविरुद्ध कोणतेच पुरावे नाही- एनआयए
नवी दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेला लेफ्टनंट कर्नल पुरोहितला एनआयकडून समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटात क्लिन चीट देण्यात आली आहे. समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात पुरोहितविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं एनआयएचं म्हणणं आहे.
समझोता एक्सप्रेस स्फोटाप्रकरणी जरी क्लीन चीट मिळाली असली तरीही मालेगाव स्फोटाप्रकरणी पुरोहितची चौकशी अजूनही सुरुच आहे. एनआयएचे डीजी शरद कुमार म्हणाले की, "समझोता बॉम्बस्फोटात त्याच्या विरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाही. तो त्या प्रकरणात कधीही आरोपी नव्हता. मी अजूनही हैराण आहे की, त्याचं नाव या प्रकरणात का जोडण्यात आलं." तसंच ते पुढे म्हणाले की, 2008 साली मालेगाव स्फोटाप्रकरणी मुबंई एटीएसने पुरोहित विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. याचप्रकरणी त्याची एनआयएकडून चौकशी सुरु आहे.
एनआयएने समझोता बॉम्बस्फोटाप्रकरणी आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ज्यामध्ये स्वामी असीमानंद, सुनील कलसंगरा, संदीप दांगे (दोघे फरार आहेत), लोकेश कुमार, कमल चौहान, अमित आणि राजेंद्र चौधरी यांचा समावेश आहे.
काय आहे समझोता बॉम्बस्फोट प्रकरण:
18 फेब्रुवारी 2007 साली हरियाणातील पानीपत जवळील समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट आणि त्यानंतर लागलेली आग यामध्ये 68 जणांचा जीव गेला होता. ज्यामध्ये महिला आण मुलांसह 12 प्रवासी जखमी झाले होते.
दुसऱ्या प्रकरणी पुरोहित आरोपी आहे. 29 सप्टेंबर 2008 साली मालेगाव स्फोटात चार लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement