एक्स्प्लोर
सेक्स-मांसाहार टाळा, आयुष मंत्रालयाचा गर्भवतींना सल्ला
नवी दिल्ली : गर्भधारणेनंतर मांसाहार, सेक्स, कुसंगत टाळा, आध्यात्मिक विचार बाळगा आणि तुमच्या खोलीमध्ये सुंदर फोटो ठेवा, तुम्हाला नक्कीच सुदृढ अपत्यप्राप्ती होईल, असा सल्ला आयुष मंत्रालयाने देशातील गर्भवतींना दिला आहे.
आयुष मंत्रालयातर्फे 'माता आणि बाल संगोपन' या विषयावरील पुस्तकात या सूचना आहेत. 2014 मध्ये आयुष मंत्रालया अंतर्गत योग आणि निसर्ग चिकित्सा संशोधन केंद्राने हे पुस्तक संपादित केलं होतं.
हिंदुत्ववादी आणि भाजपच्या काही नेत्यांनी आरोग्यसेवेच्या नावाखाली अशास्त्रीय सिद्धांतांचा प्रसार केल्याचा आरोप वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं प्रकाशन केलं. हे पुस्तक तीन वर्षांपूर्वी संपादित करण्यात आलं होतं. योगविद्येच्या आधारे गर्भवतींना उपयुक्त ठरणाऱ्या सूचनांचा संग्रह केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सेक्सपासून दूर राहण्याचा कुठलाही सल्ला यात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement