एक्स्प्लोर
Advertisement
पेट्रोलपंपावर कार्डद्वारे पेमेंटचा ग्राहकांवर भुर्दंड नाही, केंद्राची ग्वाही
नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांसाठी ग्राहकांना आणि पेट्रोलपंप चालकांना कुठल्याही प्रकारचा अधिकचा कर भरावा लागणार नाही, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
ऑनलाईन आणि डिजिटल व्यवहारांवरील कराचा भार नेमका कुणी पेलायचा यावर बँका आणि तेल कंपन्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचं प्रधान यांनी सांगितलं.
केंद्र सरकारनं पेट्रोल पंपांवर डेबिट, क्रेडिट कार्ड वापरलं तर 0.75 टक्के सूट देणार असल्याचं जाहीर केलं होतं. अर्थात हा पैसा तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपचालकांना मिळणार होता. मात्र तो मिळाला नाही.
काल काही खासगी बँकांनी मर्चंट डिस्काऊंट रेटच्या नावाखाली 1 हजार रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारावर 0.25 टक्के 2 हजारापर्यंतच्या व्यवहारावर 0.50 टक्के तर त्यावरील व्यवहारावर 1 टक्का कर घोषित केला. ज्याचा भार पंपचालकांना उचलावा लागणार होता. मात्र देशातील 50 हजाराहून अधिक पंपचालकांनी याविरोधात बंदचं हत्यार उपसल्यानं हा निर्णय 13 जानेवारीपर्यंत मागे घेण्यात आला आहे.
दरम्यान, देशातील पेट्रोलपंप चालकांना केंद्र सरकारनं फुकटात वापरुन घेतल्याची भावना ‘फामपेडा’चे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement