(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होते आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजही मुंबईत पेट्रोलमध्ये 37 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलही 39 पैशांनी वधारले आहे.
नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या की, हा एक गंभीर मुद्दा आहे, ज्यामध्ये किंमत कमी करण्याव्यतिरिक्त कोणतचं उत्तर देणं योग्य नाही. केंद्र आणि राज्य दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांमध्ये कमतरता आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
त्याचसोबत ते म्हणाले की, "ओपीईसी देशांनी उत्पादनाचं जे अनुमान लावलं होतं, तेदेखील खाली येण्याची शक्यता आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तेलाच्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण नाही, ते तांत्रिकदृष्ट्या मुक्त करण्यात आले आहे. तेल कंपन्या कच्चं तेल आयात करतात, रिफाइन करतात आणि विकतात."
#WATCH: Finance Minister Nirmala Sitharaman speaks on fuel price hike, "It's a vexatious issue in which no answer except for fall in fuel price will convince anyone. Both Centre & State should talk to bring down retail fuel price at a reasonable level for consumers..." pic.twitter.com/28LGWNye7I
— ANI (@ANI) February 20, 2021
मुंबईत पेट्रोल 97 रुपये प्रती लीटर
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होते आहे. सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानं सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आजही मुंबईत पेट्रोलमध्ये 37 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलही 39 पैशांनी वधारले आहे. मुंबईत आज पेट्रोल 96.94 रुपये आहे तर डिझेल 88.01 रुपये बघायला मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात नियंत्रणात आणून दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होतांना दिसते आहे.
देशातील प्रमुख शहरातील दर
मुंबई - पेट्रोल 96.94 रुपये, डिझेल 88.01 रुपये दिल्ली - पेट्रोल 90.58 रुपये, डिझेल 80.97 रुपये चेन्नई - पेट्रोल 92.59 रुपये, डिझेल 85.98रुपये कोलकाता - पेट्रोल 95.33 रुपये, डिझेल 84.56 रुपये
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. बेंचमार्क क्रूड ऑईल 63 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेलं आहे. आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केट इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीई) मधील बेंचमार्क क्रूड ऑईल मंगळवारीच्या सत्रात 0.51 टक्क्यांनी वधारून 63.62 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं. न्यूयॉर्क मर्केंटाइल एक्सचेंजवर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या (डब्ल्यूटीआय) मार्च कॉन्ट्रॅक्टमध्ये सत्रातील 1.31 टक्क्यांनी वाढून 60.25 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं होतं.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवे दर हे सकाळी 6 पासूनच लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड आयओसीएलच्या वेबसाईटरवर मिळेल. देशातील काही शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आहेत. इंधनाच्या किमती शहरांनुसार वेगवेगळ्या असू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Petrol and Diesel prices Today : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग बाराव्या दिवशी वाढ