एक्स्प्लोर

Nirbhaya Case | फाशी टाळण्यासाठी निर्भयाचा दोषी पवन गुप्ता सुप्रीम कोर्टात

16 डिसेंबर 2012 रोजी मी अल्पवयीन होतो, म्हणून मला फाशी होऊ शकत नाही, असा दावा निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने याचिकेत केला आहे. त्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताच्या याचिकेवर (स्पेशल लीव्ह पिटीशन) आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुन्हा केला त्यावेळी आपलं वय 18 वर्षांपेक्षा कमी होतं आणि अल्पवयीन होतो, असा दावा पवन गुप्ताने याचिकेत केला आहे. न्यायमूर्ती आर भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए एन बोपण्णा यांचं खंडपीठ पवन गुप्ताच्या याचिकेवर सुनावणी करेल. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही पवनचा अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला होता. तसंच वकिलांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. दोषी पवन गुप्ताने सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टाच्या 19 डिसेंबरच्या आदेशाला आव्हान दिलं होतं, ज्यात बनावट कागदपत्रे सादर करणं आणि कोर्टात हजर न राहण्याबाबत वकिलांना फटकार लगावली होती. पवन गुप्ताला सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळणार नाही, असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे. सुप्रीम कोर्टानेही पवन गुप्ताची याचिका फेटाळली तर क्युरेटिव्ह पिटीशन आणि राष्ट्रपतींकडे दया अर्ज याचाही तो आधार घेऊ शकतो. निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ करावं : इंदिरा जयसिंह वकील एपी सिंह यांच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेत पवन गुप्ताने दावा केला आहे की, 16 डिसेंबर 2012 रोजी केलेल्या गुन्ह्याच्या वेळी आपण अल्पवयीन होतो. शाळेच्या दाखल्यावर माझी जन्मतारीख 8 ऑक्टोबर 1996 आहे, असा दावा पवन गुप्ताचा आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणीही त्याने याचिकेत केली आहे. 1 फेब्रुवारीला फाशी? दरम्यान निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी 1 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने या चौघांसाठी 1 फेब्रुवारीचा डेथ वॉरंट जारी केला आहे. याअंतर्गत मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता या चारही दोषींना 1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येईल. याआधी चारही जणांना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. निर्भयाच्या दोषींविरोधात न्यायालयाने जारी केलेलं 'डेथ वॉरंट' आहे तरी काय? मुकेश सिंहचा दया अर्ज फेटाळला निर्भया प्रकरणातील आणखी एक आरोपी मुकेश सिंहचा दया अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यापूर्वीच फेटाळला आहे. क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळल्यानंतर मुकेशने राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल केला होता. परंतु राष्ट्रपतींनी तो देखील फेटाळल्यामुळे त्याच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?

- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. - सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. - त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. - यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले. - तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. - दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. - मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या चार दोषींची नावं आहेत. तर या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. 2015 रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर चारही दोषींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या होत्या.

संबंधित बातम्या

Nirbhaya Case | राष्ट्रपतींनी दोषी मुकेश सिंहच्या दयेचा अर्ज फेटाळला!

निर्भया प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी नाही....

निर्भयाच्या दोषींच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाची मोहोर; सुधारित याचिका फेटाळली

तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींच्या फाशीची तालिम; 22 जानेवारीला देण्यात येणार फाशी

निर्भया प्रकरणातील एका दोषीची सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका; फाशीला स्थगिती देण्याची मागणी

निर्भयाच्या दोषींना फाशीच; 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता शिक्षेवर अंमलबजावणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget