एक्स्प्लोर
सिमांचल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 7 जणांचा मृत्यू
ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. सीमांचल एक्सप्रेसचे 9 डब्बे सहदेई स्टेशनजवळ पटरीवरुन खाली उतरले. ही दुर्घटना कशामुळे घडली याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
पाटना : बिहारच्या हाजीपूरजवळ सिमांचल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत काहीजण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
बिहारच्या वैशालीमध्ये सीमांचल एक्स्प्रेसचे 9 डबे रूळावरून घसरले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 हून अधिक लोक जण जखमी झाले आहेत. एसी कोचचं या अपघातात मोठं नुकसान झालं आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. तसंच 2 एक्स्प्रेसही बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
ही एक्सप्रेस जोगबनीवरुन दिल्लीकडे जात होती. त्यावेळी ही घटना पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. एक्सप्रेसचे 9 डब्बे सहदेई स्टेशनजवळ पटरीवरुन खाली उतरले. ही दुर्घटना कशामुळे घडली याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.Nine bogies of Jogbani-Anand Vihar Terminal Seemanchal Express were derailed in Bihar's Sahadai Buzurg
Read @ANI Story | https://t.co/XBXFpl69o6 pic.twitter.com/zfITd54iwI — ANI Digital (@ani_digital) February 3, 2019
बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.Indian Railways has issued helpline numbers for Seemanchal Express derailment: Helpline numbers at Sonpur — 06158221645; Hajipur —06224272230 and Barauni — 0627923222.
— ANI (@ANI) February 3, 2019
Rescue and relief operations are on for derailment of 9 coaches of Jogbani-Anand Vihar Terminal Seemanchal express at Sahadai Buzurg, Bihar. Help lines: Sonpur 06158221645 Hajipur 06224272230 Barauni 06279232222
— Piyush Goyal Office (@PiyushGoyalOffc) February 3, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement