एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Udaipur Murder Case : उदयपूरमधील कन्हैया लालच्या हत्येचा तपास आता NIA कडे, दहशतवादी संबंध तपासणार

Rajasthan News: उदयपूरमधील कन्हैया लाल नावाच्या एका टेलरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दहशतवादी गटाचा संबंध आहे का याचा तपास करण्यात येत आहे.

नवी दिल्ली: राजस्थानमधील टेलर कन्हैया लाल हत्येचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency -NIA) करणार आहे. या हत्येतील आरोपी असलेल्या दोघांचा एनआयएने चौकशी सुरू केली असून या हत्येमागे दहशतवादी गट कार्यरत आहेत का याचा तपास करण्यात येत आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी दहशतवादविरोधी कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?
सोमवारी उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात दोन जणांनी दुकानात घुसून कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीचा गळा चिरून त्याचा खून केला. या घटनेनेतर कन्हैया याचा गळा चिरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यामुळे उदयपूरमधील वातावरण तापलं होत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आदेश येईपर्यंत उदयपूरच्या सात पोलीस ठाण्यांच्या परिसरात तात्काळ संचारबंदी लागू करण्यात आली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया याची हत्या करण्यात आल्यानंतर आरोपींना राजसमंद जिल्ह्यातील भीम परिसरातून त्याब्यात घेण्यात आले. राजसमंदचे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी हेल्मेट घालून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण भीमा परिसरात नाकाबंदी दरम्यान त्यांना पकडले गेले.

एका व्हिडीओ क्लिपमध्ये कथित हल्लेखोर एका व्यक्तीचा शिरच्छेद करत असल्याचे सांगत असल्याचे ऐकू येते. त्यात नुपूर शर्मा यांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यांना प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल भाजपमधून निलंबित करण्यात आले होते. कन्हैया याने नुपूर शर्मा यांची स्तुती करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, दोन्ही आरोपी दुपारी धनमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कन्हैया याच्या दुकानात पोहोचले. त्यापैकी एकाने आपले नाव रियाज असे घेतले. त्याने स्वतःची एक ग्राहक म्हणून ओळख करून दिली आणि कपडे शिवायची असल्याचे सांगितले. त्यानंतर कन्हैया याने मापे घ्यायला सुरुवात केली. याचवेळी त्याने कन्हैयावर हल्ला केला. अन्य आरोपींनी मोबाईलवरून घटनेचा व्हिडीओ बनवला. या घटनेत कन्हैयाचा जागीच मृत्यू  झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget