एक्स्प्लोर

New Parliament: 75 रुपयांचं चांदीचं नाणं, संविधानाची प्रत अन् बरंच काही; नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी खासदारांना कोणत्या भेटवस्तू मिळणार?

Special Gift For MPs: नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होतंय. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचं फोटोशूट होईल. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

New Parliament Gifts For MPs: देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसदेचा आज मंगळवारी (19 सप्टेंबर) निरोप घेतला जाणार आहे. नवीन संसदेत खासदारांचा प्रवेश सकाळी 11 वाजता होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः सर्व खासदारांचं स्वागत करणार आहेत. हा विशेष दिवस ऐतिहासिक बनवण्यासाठी संसद, राज्यसभा (Rajya Sabha) आणि लोकसभा (Lok Sabha) या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत. भेटवस्तूंमध्ये संविधानाची प्रत, 75 रुपयांचं चांदीचं नाणं आणि नवीन संसदेचा शिक्का असलेली पुस्तिका यांचा समावेश आहे. याशिवाय संसद भवनाच्या सीलसह इतर अनेक भेटवस्तूही यात असतील.

सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पोहोचतील. पंतप्रधानांसोबत लोकसभा आणि राज्यसभेतील ज्येष्ठ मंत्री आणि खासदारही असतील. यावेळी सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम होणार असून त्यात भारताला 2047 पर्यंत समृद्ध राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. सेंट्रल हॉलमधून पंतप्रधान संविधानाची प्रत घेऊन नवीन इमारतीकडे जातील. सर्व खासदार पीएम मोदींना फॉलो करतील. 

नवीन संसदेत प्रवेश केल्यानंतर, औपचारिक पूजा करावी लागेल, ज्यासाठी किमान दीड तास लागू शकतो. यानंतर, दुपारी ठीक दीड वाजता नवीन संसद भवनात कामकाज सुरू होईल. तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.15 वाजता सुरू होईल.

आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा' 

देशाच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी, नवं संसद भवन सज्ज झालं आहे. आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज नव्या संसद भवनातून सुरू होणार आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या संसदीय वारशाचे स्मरण करण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याची शपथ घेण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभाचे नेतृत्व उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत. अंदाजे दीड तास हा सोहळा सुरू राहणार असून त्याची सुरुवात आणि शेवट राष्ट्रगीतानं होणार आहे. त्यानंतर दुपारचं जेवण होईल आणि मग प्रमुख नेते सर्व खासदारांना नवीन संसद भवनात घेऊन जातील.

राज्यसभेच्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, "भारतीय संसदेच्या समृद्ध वारशाचं स्मरण करण्यासाठी आणि 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांना 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता एका कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती आहे. दुपारी 1 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित राहावं."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Embed widget