सकाळी सापडली स्फोटक रसायने आणि शस्रे, सायंकाळी स्फोट, दिल्ली स्फोटाचा जैश-ए-मोहम्मदशी संबंध असेल का?
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील परिसरात एका कारमध्ये स्फोट (New Delhi Bomb Blast) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
New Delhi Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील परिसरात एका कारमध्ये स्फोट (New Delhi Bomb Blast) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संध्याकाळी 6 वाजून 50 मिनीटांच्या आसपास ही घटना घडली आहे. यामध्ये आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आज सकाळीच जम्मू-काश्मीर आणि फरिदाबादमध्ये पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या नेटवर्ककडून 2 हजार 900 किलो स्फोटके जप्त केली आहेत. त्यामुळं आता या दोन्ही घटनांचा संबंध आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत एनआयए चौकशी करत आहे.
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की पाच ते सहा पार्क केलेल्या गाड्या उद्ध्वस्त झाल्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा स्फोट एका इको व्हॅनजवळ झाला. प्राथमिक तपासात हा स्फोट उच्च-तीव्रतेचा असल्याचे दिसून येते. स्फोटाचे कारण किंवा जबाबदार कोण आहे याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांची मोठी कारवाई
जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी काल रात्री उशिरा केलेल्या संयुक्त कारवाईत बनवलेल्या धोकादायक रसायनांच्या जप्तीशी दिल्ली बॉम्बस्फोटांचा संबंध असू शकतो का, हा आता मोठा प्रश्न आहे. पोलिसांनी 2900 किलो आयईडी बनवण्याचे साहित्य, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि अन्सार गजवत-उल-हिंद (एजीयूएच) शी संबंधित आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करताना ही जप्ती करण्यात आली आहे.
स्फोटानंतर दिल्ली पोलिस आयुक्तांकडून पहिली प्रतिक्रिया समोर
स्फोटानंतर दिल्ली पोलिस आयुक्तांकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी स्फोटाबाबत म्हटले की, या स्फोटाची चौकशी केली जात आहे. हा सामान्य स्फोट नाही. आज संध्याकाळी 6 वाजून 52 मिनीटांच्या सुमारास एक कार हळूहळू जात होती आणि लाल दिव्यावर थांबली. त्या कारमध्ये स्फोट झाला आणि स्फोटामुळे जवळच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. एफएसएल आणि एनआयएसह सर्व एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी तपासही सुरु केला आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जखमी झाले आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. गृहमंत्र्यांनीही आम्हाला फोन केला आहे आणि आम्ही वेळोवेळी त्यांच्यासोबत माहिती शेअर करत असल्याची माहिती ल्ली पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
























