एक्स्प्लोर
500 आणि 1000 ची नोट न स्वीकारल्याने नवजात बालकाचा मृत्यू?
बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : बुलंदशहरातील खुर्जास्थित कैलाश हॉस्पिटलने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा न स्वीकारल्याने एका नवजात बालकावर उपचार होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे. केंद्रीय मंत्री महेश शर्मा हे कैलाश हॉस्पिटल ग्रुपचे चेअरमन आहेत.
हॉस्पिटलच्या सीएमएसच्या दाव्यानुसार, हॉस्पिटलमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. मात्र, याच हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये 500 किंवा 1000 ची नोट दिल्यास औषधं दिली जात नाहीत. त्यामुळे हॉस्पिटलचा दावा खोटा असल्याचे उघड झाले आहे.
प्रकरण काय आहे?
एकता रघुवंशी यांच्या डिलिव्हरीसाठी पती अभिषेक रघुवंशी हे 100-100 रुपयांच्या नोटा गोळा करु शकले नाहीत. त्यामुळे हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिल्याने एकता यांच्यावर उपाचारास उशीर झाला. या सर्व प्रकारामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला, असा आरोप होत आहे.
हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून आता असा दावा करण्यात येतोय की, एकता रघुवंशी यांनी मृत बाळाला जन्म दिला. मात्र, हॉस्पिटलचा दावा अत्यंत खोटा असल्याचे मेडिकलमधील स्थितीवरुन लक्षात येते. कारण हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. परिणामी रुग्णांना औषधं खरेदी करता येत नाहीत आणि त्यामुळे उपचारास उशीर होत आहे.
आता केंद्रीय मंत्री महेश शर्मा चेअरमन असलेल्या कैलाश हॉस्पिटलवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement